पुण्यात ओबीसी मोर्चाला परवानगी नाकारली; समीर भुजबळ पोलिसांच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 December 2020

पुण्यात आज आरक्षणासह विविध मागण्यांसाठी शनिवारवाडा येथून ओबीसी मोर्चाची सुरवात होणार होती. ओबीसी कार्यक्रर्ते आणि नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा मोर्चांना परवानगी नसल्याने पुणे पोलिसांनी शनिवारवाडा येथून मोर्चा पुढे नेण्यास परवानगी नाकारली. दरम्यान, मा. खा. समीर भुजबळ यांना पोलिसांना ताब्यात घेण्यात आले आहे.
 
पुणे : पुण्यात ओबीसी मोर्चाला सुरवात झाली मात्र, मोर्चा पुढे नेण्यास पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. दरम्यान,  माजी खासदार समीर भुजबळ पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आक्रमक झालेल्या ओबीसी कार्यक्रर्ते आणि नेत्यांनी शनिवारवाड्या समोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुण्यात आज आरक्षणासह विविध मागण्यांसाठी शनिवारवाडा येथून ओबीसी मोर्चाची सुरवात होणार होती. ओबीसी कार्यक्रर्ते आणि नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा मोर्चांना परवानगी नसल्याने पुणे पोलिसांनी शनिवारवाडा येथून मोर्चा पुढे नेण्यास परवानगी नाकारली. दरम्यान, मा. खा. समीर भुजबळ यांना पोलिसांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पुण्यात हवाला व्यवहारावर मोठी कारवाई; कोट्यवधी रूपयांची रोकड जप्त

दरम्यान, ओबीसी कार्यक्रर्ते आणि नेत्यांनी शनिवारवाड्या समोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे. लवकरात लवकर रस्ता मोकळा करण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहे. दरम्यान, मोजके लोक जिल्हाधिकारी कार्यलयात जाऊन निवेदन द्यावे असा तोडगा पोलिसांनी सुचवला आहे. त्यावर नेते निर्णय घेणार आहेत.
 
पुणे : पोलिस ठाण्यात ह्रदयविकाराचा झटका आल्याने अधिकाऱ्याचे निधन

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Denied OBC morcha in Pune and Sameer Bhujbal in police custody