esakal | पुणे : पोलिस ठाण्यात ह्रदयविकाराचा झटका आल्याने अधिकाऱ्याचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

Officer dies of heart attack at police station In pune

दत्तनगर चौकीत शिंदे यांची रात्रपाळी होती. त्यावेळी ते बाथरुमला गेले असता तेथेच पडले. त्यानंतर त्यांना सहकाऱ्यांकडून भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पुणे : पोलिस ठाण्यात ह्रदयविकाराचा झटका आल्याने अधिकाऱ्याचे निधन

sakal_logo
By
अशोक गव्हाणे

कात्रज(पुणे) : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अनील संभाजी शिंदे यांचे आज (ता. ०३) सकाळी कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराचे तीव्र झटका आल्याने निधन झाले. ते ५७ वर्षाचे होते. ते भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या अंकित असणाऱ्या दत्तनगर पोलिस चौकीत कार्यरत होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दत्तनगर चौकीत शिंदे यांची रात्रपाळी होती. त्यावेळी ते बाथरुमला गेले असता तेथेच पडले. त्यानंतर त्यांना सहकाऱ्यांकडून भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी त्यांना ससून रुग्णालयात नेण्यात आले असून उत्तरीय तपासणीचे अहवाल येणे बाकी आहे. हवालदार ते सहाय्यक पोलिस फौजदार असा त्यांचा कौतुकास्पद प्रवास होता. तसेच ते एप्रिल २०२१ मध्ये म्हणजेच आणखी पाच महिन्यांनी सेवानिवृत्त होणार होते. त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली.  

मराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली

त्यांच्या जाण्याने भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन परिवारांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत असून त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ होता. तसेच, आपल्या कामाने जनमानसात त्यांनी चांगली प्रतीमा निर्माण केली होती, असे भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे त्यांचे सहकारी सांगतात. सध्या ते खडक पोलीस स्टेशनच्या पोलिस लाईनमध्ये राहण्यास होते. त्यांचे मुळगाव हे इंदापूर तालुक्यातील कळस आहे. त्यांच्या पाश्चात दोन मुले अजय, अक्षय एक मुलगी मोनिका आणि पत्नी सुनंदा असा परिवार आहेत.

...फक्त लग्न मोडले म्हणून!

loading image
go to top