Junnar News : जुन्नरहून भवानीमातेच्या पलंगाचे तुळजापूरकडे प्रस्थान

श्री तुळजा भवानीमातेच्या श्रमनिद्रेसाठी तुळजापूर येथे जाणाऱ्या मातेच्या पलंगाचे आज शनिवार ता.३० रोजी पारंपारिक वाद्यांच्या गजरात भंडारा-खोबऱ्याची उधळण करत प्रस्थान
Departure palang to Tuljapur for Shramnidra of Sri Tulja Bhavanimata today junnar culture
Departure palang to Tuljapur for Shramnidra of Sri Tulja Bhavanimata today junnar cultureSakal

जुन्नर : श्री तुळजा भवानीमातेच्या श्रमनिद्रेसाठी तुळजापूर येथे जाणाऱ्या मातेच्या पलंगाचे आज शनिवार ता.३० रोजी पारंपारिक वाद्यांच्या गजरात भंडारा-खोबऱ्याची उधळण करत प्रस्थान झाले. घोडेगाव ता.आंबेगाव येथून श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे गुरूवार ता. २१ रोजी जुन्नरला आगमन झालेनंतर दुपारी मातेच्या पलंग व पालखीची शहरातून मिरवणुक काढण्यात आली.

शुक्रवार ता.२२ रोजी सायंकाळी श्री तुळजा भवानी मातेची पलंगावर विधिवत स्थापना करण्यात आली. पलंगाचे जुन्नर येथे नऊ दिवस वास्तव्य होते. या काळात विविध धार्मिक कार्यक्रम व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

दररोज पहाटे श्री दुर्गा सप्तशती पाठ, सांयकाळी भजन व देवीची महाआरत,रात्री श्रीदेवी भागवत कथा,मंगळगौरी आदी धार्मिक तसेच चित्रकला, रांगोळी,फॅन्सी ड्रेस,सोलो, ग्रुप डान्स आदी स्पर्धा असे कार्यक्रम झाले. शुक्रवार ता.२९ रोजी सकाळी होमहवन सायंकाळी श्री देवी भागवत कथा सांगता व नंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते.

यानंतर पलंगाच सकाळी (ता.३०) शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती.पलंगाचे मानकरी बुट्टे पाटील,देशमुख कुटुंबीय तसेच अन्य भाविकांच्या घरासमोर पलंग दर्शनासाठी नेण्यात आला. यावेळी भाविकांनी घरासमोर सडा-रांगोळ्या,पायघड्या टाकून पलंगाचे स्वागत केले.

गोंधळी,भराडी संबळ वाद्यासह मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी पलंगाची पूजा व दर्शनासाठी भाविकांनी ठिकठिकाणी मोठी गर्दी केली होती. जुन्नर वरून कुमशेत, हापूसबाग, आर्वी, नारायणगाव.

पिंपळवंडी, आळेफाटा,राजूर,बेल्हा,पारनेर व नगर मार्गे तुळजापूर मध्ये घटाच्या सातव्या माळेपर्यंत पोहचत असतो.तुळजापूर येथे या पलंगावर आई तुळजा भवानी दैत्याला मारून दसरा ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत निद्रा करीत असते. मागील वर्षी गेलेल्या पलंगावरून वरून आई तुळजा भवानी देवीची नवीन पलंगावर स्थापना केली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com