लाडक्‍या कुत्र्याचा मृत्यूमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

कनवर हर्षवर्धनसिंग राघव (वय 22, रा. सिंबायोसिस हॉस्टेल, खडकी, मूळ रा. रायपूर छत्तीसगड) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
 

पुणे - लाडक्‍या कुत्र्याचा मृत्यू झाल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्याने सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हडपसरमध्ये उघडकीस आली आहे.

कनवर हर्षवर्धनसिंग राघव (वय 22, रा. सिंबायोसिस हॉस्टेल, खडकी, मूळ रा. रायपूर छत्तीसगड) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

कनवर हा सिंबायोसिस महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. महाविद्यालयाच्या वसतिगृहात तो राहत असे. सुटीच्या दिवशी तो गोंधळेनगर येथील वडिलांच्या मित्राच्या घरी येत असे. संध्याकाळी घरातील सर्व जण काही कामानिमित्त बाहेर गेले होते. घरात कोणी नसताना त्याने सहाव्या मजल्यावरून उडी मारली. त्यामुळे त्याच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या लाडक्‍या कुत्र्याचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला होता. त्यातून त्याला निराशा आली होती. त्याच्या वहीमध्ये त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळून आली आहे. त्यात "लाडक्‍या कुत्र्याच्या मृत्यूचा विरह सहन होत नसल्याने मी त्याच्याकडे जात आहे. माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरले जाऊ नये. आई-वडिलांनी मला माफ करावे,' असे नमूद केले आहे.

कनवर याने आत्महत्या केली असावी, असे प्रथमदर्शनी दिसून येते आहे, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक राहुल घुगे यांनी दिली.

Web Title: Depressed after pet dog's death, management student ends life