नगरसेवक दत्ता साने यांच्यासारखा झुंजार सहकारी गमावला: अजित पवारांची श्रद्धांजली

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 July 2020

''पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सभागृहातील तसेच सामाजिक क्षेत्रातील त्यांचं योगदान कार्यकर्त्यांना प्रेरणा देईल,'' असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक दत्ता साने यांच्या निधनाने जनतेच्या प्रश्नासाठी तळमळीने काम करणारा झुंजार कार्यकर्ता, चांगला सहकारी गमावल्याची भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाला रोखण्यासाठी पुणे पोलिसांचे आणखी एक पाऊल; नागरिकांच्या प्रवासावर येणार...

उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात की, ''राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक दत्ता साने यांनी सामान्य जनतेचे प्रश्न  सोडविण्यासाठी तळमळीने काम केले. महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी केलेले काम कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धडाडीचा कार्यकर्ता गमावला आहे. संघटनेची ध्येयधोरणे तडफेने राबविणाऱ्या या झुंजार कार्यकर्त्याची, सहकाऱ्याची उणीव कायमच जाणवेल.

'पुणेरी पाटी'ने सुरु केलं ऑनलाइन युद्ध, विषय हैदराबादी बिर्याणीचा 

''पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सभागृहातील तसेच सामाजिक क्षेत्रातील त्यांचं योगदान कार्यकर्त्यांना प्रेरणा देईल,'' असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar gives Tribute to Corporator Datta Sane