कोरोनाला रोखण्यासाठी पुणे पोलिसांचे आणखी एक पाऊल; नागरिकांच्या प्रवासावर येणार मर्यादा!

Pune-Police
Pune-Police
Updated on

पुणे : शहरात दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोनाबाधीतांची संख्या लक्षात घेऊन शहरात रिक्षा, टॅक्सी आणि चारचाकी गाड्यांमधून चालकासह केवळ तीन जणांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच लग्न समारंभ आणि अन्य कार्यक्रमासाठी ५० पेक्षा जास्त व्यक्तींना मनाई करण्यात आली आहे, असे पोलिस आयुक्त डॉ. के.वेंकटेशम यांनी  ट्विटरद्वारे सांगितले आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता.३) रात्रीपासून शहरात मोठ्या प्रमाणात नाकेबंदी करण्यास सुरुवात करण्यात आली.

शहरात मागील काही दिवसांपासुन कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दररोज 800 ते 900 पर्यंत रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी प्रशासन, महापालिका व पोलीस प्रशासन सातत्याने काम करत आहे. संचार मनाई आदेश काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर नागरीक मोठ्या संख्येने घराबाहेर पडुन सार्वजनिक ठिकाणावर गर्दी करत असल्याचे चित्र आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडत आहेत. तसेच रस्त्यावर गर्दी होऊ लागली आहे. तसेच शहराच्या प्रतिबंधित नसलेल्या भागात देखील रुग्णसंख्या वाढत आहे. 

या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने पुन्हा एकदा नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षितता लक्षात घेऊन कडक पावले उचलण्यास सुरुवात केली. त्यानुसार, आता रिक्षा, टॅक्सी आणि चारचाकी वाहनांमधून प्रवास करताना मर्यादा येणार आहे. त्यानुसार शहरात आता रिक्षा, टॅक्सी आणि चारचाकी वाहनातून प्रवास करताना चालकासह तीन व्यक्तींना प्रवास करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. तसेच लग्न समारंभ, अन्य सार्वजनिक व घरगुती कार्यक्रमाला ५० व्यक्तीपेक्षा जास्त नागरिक जमविण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. वेंकटेशम यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. नागरीकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. अन्यथा पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. 

दरम्यान, शुक्रवारी रात्रीपासून शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पोलिसांनी नाकेबंदी करुन नागरीकांची कसून तपासणी करण्यास सुरुवात केली. तसेच रस्त्यावर पुन्हा एकदा पोलिसांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. याविषयी पोलिस सह आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे म्हणाले, "शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.त्यावर नियंत्रण आणण्यासाठी रात्री विनाकारण शहरात फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्यासाठी नाकेबंदी वाढविली आहे."

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Bibwewadi NEET Paper Leak Case: Key Suspect Manisha Waghmare in Custody
Baramati Flight Academy Faces Safety Questions Amid Series of Aircraft Mishaps
Pune Elderly Couple Promotes Fitness and Healthy Living Through Daily Cycling
WFH Back in Focus: Pune Tech Workers Seek Relief from Daily Traffic Chaos
Marathi News Esakal
www.esakal.com