उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात आता तो पहिला रूग्ण...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 May 2020

पुण्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण आज कसा आहे ? त्याच्यापासून नातेवाइकांना लागण झाली का? अशी विचारणा करीत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोनामुक्तांची चौकशी केली.

पुणे : पुण्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण आज कसा आहे ? त्याच्यापासून नातेवाइकांना लागण झाली का? अशी विचारणा करीत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोनामुक्तांची चौकशी केली. तर, सगळे रुग्ण ठणठणीत व्हावे, यासाठी वेळेत आणि अपेक्षित उपचार द्या, अशा सूचनावजा आदेशही पालकमंत्र्यांनी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे शहर, जिल्ह्यातील रुग्ण, त्यांच्यावर उपचार, उपलब्ध यंत्रणा आणि मागण्यांचा आढावा घेण्यासाठी पवार यांनी बुधवारी महापलिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर कोरोनाची माहिती संकलित करण्यासाठी उभारलेल्या स्मार्टसिटी कार्यालयातील यंत्रणेची पाहणीही त्यांनी केली. महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी, नवल किशोर राम, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

शहरातील कोणत्या भागांत रुग्ण आहेत, त्यांच्या वाढीचा वेग, बाधित क्षेत्र आणि त्याबाहेरील हद्दीतील रुग्ण वाढीचे प्रमाण, मृत्यू दर, मृतांची कारणे, लॉकडाउनमधील शिथिलता, त्याचे परिणाम, याची सविस्तर माहिती रुबल अग्रवाल यांनी पवार यांना दिले. दरम्यान, स्मार्टसिटीने निर्माण केलेल्या "डॅशबोर्ड'सह सर्व यंत्रणेची माहिती जाणून घेताच त्याबाबत पवार यांनी समाधानही व्यक्त केले. 

हेही वाचा- कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलंय आनंदनगर

पवार म्हणाले, ""कोरोनाच्या संकटाचा सामाना एकत्रित करायचा आहे. रोज सापडणाऱ्या रुग्णांवर उपचार करताना, नव्या रुग्ण आढळून येणार नाहीत, यादृष्टीने कठोर नियोजन करा. या मोहिमेसाठी जिथे कुठे निधी लागेल, त्यासाठी मोकळेपणाने मागणी करा, पुरेशा प्रमाणात निधी पुरविण्यात येईल.'' 

पुण्यात कोरोनाला रोखण्याकरिता कठोर उपाय आखूनही कोरोनाचा संसर्ग थांबत नसल्याची बाब राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार गांभीर्याने घेतली आहे. 'आपण कोरोनाला का रोखू शकत नाहीत, कोण कुठे कमी पडते आहे ? ' अशी विचारणा करीत, अजित पवारांनी पुण्यातील आमदार-खासदारांना चर्चेला बोलाविले आहे. पुण्यातील कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग पाहता अजित पवार पुणेकरांसाठी कठोर निर्बंध लादणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अजित पवार यांच्या समवेत दुपारी चार वाजता आमदार आणि सर्व खासदारांची बैठक होणार आहे. कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन लगेचच नवे उपाय आखले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याबाबत राजकीय नेते, आमदार, खासदार राजी नसल्याने गेल्या काही दिवसांपासून दिलेल्या सवलती मागेही घेतल्या जाऊ शकतात का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar questioned the patients