मुळशी प्रकल्पाचा वाढीव पाणीपुरवठ्याचा अहवाल सादर करा, अजित पवारांनी दिल्या सूचना

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

- जलसंपदा विभागाच्या कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

पुणे : मुळशी प्रकल्पातून सिंचन आणि पिण्यासाठी दोन टीएमसी वाढीव पाणी मिळण्याबाबत, तसेच कोळवण खोऱ्यातील शेतीसाठी पाणी उपसा योजना राबविण्यासाठी सुर्वे समितीने लवकर अहवाल सादर करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विधानभवन सभागृहात शुक्रवारी आयोजित बैठकीत जलसंपदा विभागाच्या विविध कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त सचिव अविनाश सुर्वे, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे आदी या वेळी उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पवार म्हणाले, की नीरा डावा कालव्यावरील वितरण प्रणालीचे विशेष दुरुस्ती प्रस्ताव, शेटफळ तलाव धरण आणि कालव्याच्या कामाचे प्रस्ताव निधीसाठी राज्य सरकारकडे सादर करावेत. नीरा डावा मुख्य कालव्यातून होणारी पाणीगळती थांबविण्यासाठी कालव्याच्या अस्तरीकरण आणि दुरुस्तीच्या कामाचा प्रस्ताव तातडीने सादर करा. नीरा नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याच्या जीर्ण झालेल्या दगडी बांधकामांचे काँक्रिटीकरण करुन बांधकामे मजबूत करावीत. इंदापूर तालुक्यातील जुन्या सरकारी इमारती, कार्यालये आणि विश्रांतीगृहाच्या इमारतीच्या दुरुस्तीची कामेही हाती घ्यावीत.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

राज्यमंत्री भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळवून देण्यासाठी अपूर्ण कामे  लवकर पूर्ण करावीत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar reviewed the work of Water Resources Department in pune