पुढील दोन महिने धोक्याचे ;उपमुख्यमंत्री अजित पवार

deputy chief minister Ajit pawar Said that next 2 months is Dangerous for baramati
deputy chief minister Ajit pawar Said that next 2 months is Dangerous for baramati

बारामती : कोरोनाचा उद्रेक टाळण्यासाठी सर्वांनी काळजी घ्या, नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून नियमांचे पालन करावे आणि प्रशासनानेही आवश्यक सर्व उपाययोजना कराव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. दरम्यान, केंद्रीय पथकाने पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत पाहणी केली आहे, आगामी दोन महिने धोक्याचे असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे, त्यांच्या निरिक्षणावरुनच प्रशासनाने नियमावली तयार केली असून सर्वांनी तिचे पालन करावे, असे आवाहन डॉ. राजेश देशमुख यांनी केले.

बारामतीत आयोजित उच्चस्तरीय बैठकीत पवार यांनी हे निर्देश दिले. बैठकीला विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देखमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपवनसंरक्षक राहुल पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, मुख्याधिकारी किरणराज यादव, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओहोळ, वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, डॉ. सुनील दराडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेते सचिन सातव उपस्थित होते. यावेळी प्रियांका गवळी यांनी कोविडसाठी २५ हजारांचा धनादेश पवार यांना प्रदान केला.

अजित पवार यांनी केल्या या सूचना
• कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी गांभीर्याने प्रयत्न करावेत.
• गर्दीवर नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना आखावी
• मास्क, सॅनेटायझरचा वापर अनिवार्य, सोशल डिस्टन्सिंग पाळावे
• लग्न व इतर कार्यक्रमात गर्दी होणार नाही यावर पोलिसांनी लक्ष ठेवावे
• कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची संख्या वाढवावी
• गृहविलगीकरणऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा.
• वैद्यकीय साधनसामग्रीची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्यावी.

''ज्येष्ठ नागरिक आणि इतर व्याधी असलेल्या रुग्णांना वेगाने लस देण्याबाबत उपाययोजना कराव्यात. लसीकरण वाढविणे गरजेचे आहे''
- मनोजकुमार लोहिया, विशेष पोलिस महानिरिक्षक.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com