राज्यात म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनचा तुटवडा : उपमुख्यमंत्री

पुण्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटत आहे, ही समाधानाची बाब आहे. मात्र पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अपेक्षेनुसार कोरोना रुग्णांची संख्या घटलेली नाही.
ajit pawar
ajit pawarFile photo
Summary

पुण्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटत आहे, ही समाधानाची बाब आहे. मात्र पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अपेक्षेनुसार कोरोना रुग्णांची संख्या घटलेली नाही.

पुणे : सध्या पुण्यात म्युकरमायकोसिसचे (Mucormycosis) ३०० रुग्ण आहेत. या आजारावर उपचार करण्यासाठी आवश्यक इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. प्रत्येक दिवशी रुग्णाला जवळपास ६ इंजेक्शन द्यावी लागत आहेत. म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण सर्व पुरवठा केंद्राच्या हातात आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार इंजेक्शनचा पुरवठा करणे शक्य नाही, ही खरी वस्तुस्थिती आहे. केंद्राकडून राज्याला पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे गरजेनुसार म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचा पुरवठा करण्यात यावा, असे निवेदन राज्य सरकारने केंद्र सरकारला दिले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. (Deputy CM Ajit Pawar comment about deficiency of mucormycosis injection in state)

कोरोना उपाययोजनासंदर्भात शुक्रवारी (ता. २१) विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीनंतर पवार बोलत होते. ते म्हणाले, ‘तौक्ते चक्रीवादळाचा फटका पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याला बसला आहे. मुख्यमंत्री त्या भागात पाहणी दौऱ्यावर असून, ते मुंबईत आल्यानंतर मदतीबाबत निर्णय घेतील.’

ajit pawar
कोरोनाची दुसरी लाट तरुणांसाठी ठरली घातक

उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, 'पुण्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटत आहे, ही समाधानाची बाब आहे. मात्र पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अपेक्षेनुसार कोरोना रुग्णांची संख्या घटलेली नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पुण्यात रेमडिसिव्हीर तुटवडा राहिलेला नाही,' सध्या पुण्यात सर्व प्रकारचे बेड्स उपलब्ध आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

मोदींनी महाराष्ट्रालाही मदत करायला हवी होती ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा केंद्रावर निशाणा

‘तौक्ते चक्रीवादळमुळे महाराष्ट्रातही नुकसान झाले आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा दौरा रद्द करून गुजरातला एक हजार कोटींची मदत जाहीर केली. गुजरातप्रमाणे महाराष्ट्रालाही मदतीचा आकडा जाहीर केला असता तर योग्य झाले असते. त्यावरून देशाच्या प्रमुखाचे लक्ष आपल्याकडेही आहे, असे वाटले असते,’ अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

‘पंतप्रधान महाराष्ट्रात मुंबईतून पुन्हा गुजरातमध्ये जाणार होते. अखेरच्या क्षणी त्यांचा दौरा रद्द झाला. भारतात गुजरात जसे राज्य आहे, तसे महाराष्ट्र आणि इतरही राज्ये आहेत. वादळामुळे केरळ, तमिळनाडू, गोव्यातही मोठे नुकसान झाले आहे. गुजरातमध्ये प्रस्ताव नसताना पाहणी केल्यानंतर मदत दिली. मोदी यांनी गुजरातला एक हजार कोटींची मदत केली तशी इतर राज्यांनाही करायला हवी होती.’

ajit pawar
उजनीच्या पाण्यासाठी इंदापूरच्या पश्‍चिम भागामध्ये चक्काजाम आंदोलने

‘म्युकरमायकोसिस’वरील औषधांसाठी केंद्राकडे पाठपुरावा :

पुण्यासह राज्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत आहेत. सरकारने या आजारावरील इंजेक्शन उत्पादक कंपन्यांसोबत संपर्क साधला. परंतु केंद्र सरकारमार्फतच त्याचे वितरण होणार आहे. म्युकरमायकोसिसवरील औषधांची पुरेशी उपलब्धता नाही, ही वस्तुस्थिती आहे. याबाबत राज्य सरकारने पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी केली आहे. या तुटवड्यावर लवकरच मार्ग काढण्यात येईल, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

पुणे शहरात कोरोना बाधितांची संख्या कमी होत चालली आहे, ही समाधानकारक बाब आहे. परंतु ग्रामीण भागात कोरोना अद्याप आटोक्यात आलेला नाही. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत सरकारकडून नियोजन करण्यात येत आहे. सर्व प्रकारचे बेड॒स आणि ऑक्सिजनची पुरेशी उपलब्धता आहे.

ajit pawar
फॅब्रिअनो महोत्सवात रंगणार पुणेरी अविष्कार

सध्या ४५ वर्षांवरील वयोगटाला प्राधान्य :

देशात सर्वात जास्त लसीकरण महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात झाले आहे. सध्या ४५ वर्षे वयांवरील व्यक्तींचा लसीचा दुसरा डोस देण्यात येत आहे. तो पूर्ण झाल्यानंतर १८ ते ४५ वर्षे वयोगटातील व्यक्तींना प्राधान्य देण्यात येणार आहे. लस उपलब्ध करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येत आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.

पुण्यातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com