अजित पवारांची मोठी घोषणा; ग्रामीण भागासाठी ५० हजार अँटीजेन टेस्ट किट देणार!

Ajit_Pawar
Ajit_Pawar

पुणे : ''पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेऊन ती आटोक्‍यात आणण्यासाठी ५० हजार अँटिजेन किट (Antigen Test Kit) देण्यात यावेत. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्‍यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल,'' असे आदेश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.१४) दिले. तसेच कोरोना बाधित रुग्णांना 'महात्मा फुले जन आरोग्य योजने'चा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांचा या योजनेत समावेश करण्याचे आदेशही त्यांनी दिले. 

पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हयातील आमदार आणि खासदारांची बैठक शुक्रवारी झाली. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार डॉ. निलम गोऱ्हे व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे बैठकीत सहभागी झाल्या. यांच्यासह खासदार डॉ. अमोल कोल्हे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार दिलीप मोहिते, अशोक पवार, संजय जगताप, राहूल कूल, अतुल बेनके, सुनिल टिंगरे, सुनिल शेळके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे, विभागीय आयुक्त सौरभ राव, प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

ग्रामीण भागातील कोरोना रुग्णदर आणि मृत्यूदर तसेच प्रशासनाच्या उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर पवार म्हणाले, "कोरोना रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने अधिकाधिक रुग्णालयांचा या योजनेत समावेश होण्यासाठी कार्यवाही करावी. हवेली, खेड, मावळ, शिरुर, पुरंदर या तालुक्‍यात रुग्णसंख्या अधिक आहे. ग्रामीण भागातील कोरोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत.'' 

बैठकीत कोण काय म्हणाले 
- प्रत्येक तालुक्‍यात कोविड केअर केंद्रात खाटांची संख्या वाढविण्यावर भर द्यावा. तसेच ग्रामीण भागातील गंभीर रुग्णांसाठी पुण्यातील रुग्णालयात राखीव खाटा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावेत : दिलीप वळसे पाटील 
- ग्रामीण भागात गंभीर रुग्णांवर वेळेत उपचार होण्यासाठी रुग्णवाहिका, व्हेंटीलेटर, ऑक्‍सिजनयुक्त खाटा आदी सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. : दत्तात्रय भरणे 
- खाजगी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांबरोबरच अन्य आजाराच्या रुग्णांनाही बेड उपलब्ध करून द्यावेत : - डॉ निलम गोऱ्हे. 
- अवाजवी शुल्क आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करावी : आमदारांची मागणी

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com