esakal | वडगाव शेरीतील रस्त्यांची 'कोंडी' सुटणार? अजित पवारांच्या उद्याच्या बैठकीकडे लागले लक्ष!
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit_Pawar

नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी रस्त्यांसोबत, काही उड्डाणपुल या भागात प्रस्तावित आहेत. त्याबाबतही या बैठकीत चर्चा होणार आहे.

वडगाव शेरीतील रस्त्यांची 'कोंडी' सुटणार? अजित पवारांच्या उद्याच्या बैठकीकडे लागले लक्ष!

sakal_logo
By
अऩ्वर मोमीन

वडगाव शेरी (पुणे) : पुण्यात कोरोना संकटाचे आव्हान उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांसमोर असले तरी विकासाच्या इतर महत्वाच्या कामांकडेही ते वैयक्तिक लक्ष देत आहेत. त्यामुळेच सोमवारी (ता.२७) पुण्यात एक महत्वाची बैठक पवार घेणार आहेत. या बैठकीत वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील आणि पुण्याच्या विकासात मोलाचे योगदान देऊ शकतील, अशा तब्बल दोन डझन रस्त्यांबाबत महत्वाचा निर्णय होणे अपेक्षीत असल्याची माहिती वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी दिली. केंद्राच्या आणि राज्याच्या विविध शासकीय विभागांमध्ये असणारा समन्वयाचा अभाव आणि तांत्रिक अडचणींच्या कोंडीत विकास आराखड्यातील हे रस्ते वर्षानुवर्षे अडकलेले आहेत.

पुण्यात नक्की चाललंय तरी काय? मृत रुग्णाच्या नातेवाईकांकडून हॉस्पिटलने उकळले पैसे!​

वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे हे या रखडलेल्या रस्त्यांबाबत विविध शासकीय विभागांकडे पाठपुरावा करीत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, वनखाते, पालिकेच्या आयुक्त, पालिकेचा भूसंपादन विभाग, पालिकेचा विधी विभाग, शहर अभियंता कार्यालय, पीएमआरडीए, केंद्र शासनाच्या अखत्यारीत येणारा सर्वे ऑफ इंडिया विभाग, पुरातत्व विभाग आदी विभागांशी संबंधीत हे रस्ते आहेत.

या सर्व विभागांशी स्वतंत्ररित्या किंवा एकत्र बैठका घेणे आणि समन्वय ठेवत पाठपुरावा करणे हे कसरतीचे काम असते. त्यामुळेच हे रस्ते वर्षानुवर्षे रखडलेले आहेत. त्यामुळे आमदार टिंगरे यांनी सर्व विभागप्रमुखांची एकत्रित बैठक घेण्याची मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे मागील सप्ताहात केली होती. त्यानुसार सोमवारी (ता.२७) बैठक घेण्यात येत आहे, अशी माहिती आमदार टिंगरे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.     

पुणे जिल्हा परिषदेने खाजगी हॉस्पिटलशी करार करावा; वळसे-पाटील यांनी का केली मागणी?​

पुण्यात प्रवेश करताना नगर रस्ता आणि त्यावर होणारी वाहतूक कोंडी ही समस्या दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करू लागली आहे. नगर रस्त्याला समांतर किंवा पर्याय ठरतील असे अनेक रस्ते नव्या तसेच आधीच्या विकास आराखड्यात नियोजीत आहेत. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे आणि पाठपुरावा न केल्याने हे रस्ते लालफितीत अडकले आहेत. परिणामी त्याचा ताण नगर रस्त्यावर येऊन वाहतुक कोंडी ही नित्याची समस्या झाली आहे. त्यामुळे सदरील रस्त्यांच्या विकासात येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी तातडीने निर्णय घेणे व कालमर्यादा देऊन अंमलबजावणी हा एकमेव मार्ग असल्याचे टिंगरे यांनी सांगितले.      

नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी रस्त्यांसोबत, काही उड्डाणपुल या भागात प्रस्तावित आहेत. त्याबाबतही या बैठकीत चर्चा होणार आहे. यातील शास्त्रीनगर चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलास पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असलेल्या आगाखान पॅलेसमुळे काही तांत्रिक अडचणी आहेत. पालकमंत्री म्हणून अजित पवार वरील संबंधीत विभाग प्रमुखांशी चर्चा करून ठोस निर्णय घेतील व आदेश देतील अशी खात्री असल्याचे टिंगरे यांनी सांगितले. त्यामुळे उद्याच्या बैठकीत वडगाव शेरीतील रखडलेल्या रस्त्यांच्या विकासाची 'कोंडी' आता तरी सुटणार का, अशी उत्सुकता आता सगळ्यांना आहे. 

कॅनॉलमध्ये वाहत चाललेल्या 'त्या' मायलेकींच्या मदतीला धावला देवदूत!​

वडगाव शेरीतील रखडलेल्या या महत्वाच्या रस्त्यांबाबत निर्णय अपेक्षीत आहे -

1. खराडी ते शिवणे नदीकाठचा रस्ता.
2.  येरवडा दफन भूमी ते वाडीया फार्म मार्गे वडगाव शेरी रस्ता.  3. सीसीडी चौक विमाननगर ते वडगाव शेरी फाटा रस्ता.
4. फिनिक्स मॉल ते व्हीआयपी रस्त्यापर्यंतचा एचसीएमटीआर रस्ता. 
5. विमाननगर येथील देवकर यांच्या मिळकतीतून जाणारा  - कोनार्क नगरसमोरील रस्ता. 
6. भारत सावंत पेट्रोल पंप ते येरवडा डांबर प्लांट रस्ता. 
7. विश्रांतवाडी चौकात धानोरीकडे जाताना बौध्द विहाराजवळील बॉटलनेक. 
8.सर्वे नंबर 32 येथील फाईव्ह नाईन चौक ते धानोरी रस्ता. 
9. धानोरी जकात नाका ते डी. वाय. पाटील कॉलेजकडे जाणारा रस्ता, मार्थेफिलस स्कूल येथे कलम 205 रस्ता आखणे.
10. दिघी, धानोरी ते लोहगाव 24 मिटरचा व्हिलेज रोड.
11. धानोरी ते चर्होलीमार्गे आळंदीला जाणार रस्ता (दोन्हीकडून पुर्ण, परंतु मध्ये वनखात्यामुळे रखडला आहे)
12. निरगुडी ते लोहगाव रस्ता वनखात्यामुळे रखडला आहे.
13. वडगाव शिंदे ते निरगुडी (वनखात्याची अडचण).   
14. धानोरी संरक्षण खात्याच्या जागेतून जाणारा पॅलेडियम ग्रँड ते सहारा सिटी धानोरी रस्ता. 
15 धानोरीतील लक्ष्मी टाऊनशीप ते स्मशानभुमी रस्ता.
16 जुना आळंदी रस्ता. 
17 विमानतळ ते पुरू सोसायटी हा टेन ट्वेन्टी रोड.
18 संजय पार्क ते दोराबजी रस्ता. 
19. विमानतळ आऊट डोअर ते व्हीआयपी रोड.
20 खराडी ते लोहगाव रस्ता. 
21. मांजरी ते खऱाडी फॉरेस्ट रोड.  
22. विश्रांतवाडी, खराडी, शास्त्रीनगर, गोल्फ क्लब उड्डाणपुलाचा आढावा.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top