'स्मार्ट पोलिसींग'चा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; पुणे ग्रामीण पोलिस राबविणार उपक्रम

Smart_Policing
Smart_Policing

पुणे : पोलिस प्रशासन अधिक लोकाभिमुख बनविण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिस (Pune Rural Police) विभागाचा 'स्मार्ट पोलिसिंग' उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. 

विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते पुणे ग्रामीण पोलिस विभागाच्या 'स्मार्ट पोलिसींग' उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. विभागीय आयुक्त सौरभ राव, 'पीएमआरडीए'चे आयुक्त सुहास दिवसे, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्यासह पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्रातील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस पदक, शौर्य पोलिस पदक आणि पोलिस पदक जाहीर करण्यात आली आहेत. या पुरस्कारप्राप्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून पवार म्हणाले, कोरोनाच्या संकटकाळात पोलिस मोठ्या जिद्दीने, शर्थीने रस्त्यावर उतरून कार्यरत आहेत. पोलिसांच्या कुटुंबीयांनी याकामी त्यांना दिलेली साथ महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत.

समाजाच्या भल्यासाठीच पोलिस कोरोनाच्या कालावधीत 'कोरोना' विरूदध लढले. आपण सर्व मिळून कोरोनाची ही लढाई निश्चित जिंकू, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. पवार म्हणाले, पुणे ग्रामीण पोलिस विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेला स्मार्ट पोलिसींग उपक्रम निश्चितच उपयुक्त आहे. स्मार्ट पोलिसींग उपक्रमामुळे पोलिस दलामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसादासोबतच पोलिस दल अधिक सतर्क होण्यास मदत होईल. पोलिस ठाण्याच्या आधुनिकीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधीची तरतूद करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले, पोलिस ठाण्याच्या कामकाजात सुसूत्रता यावी, यासाठी स्मार्ट पोलिसींग उपक्रम राबविला जात आहे. महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी गावोगावी महिला सुरक्षा समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सोर ग्रुपच्या सेजल रुपलग आणि समीर रुपलग या दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला. बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद मोहिते यांनी आभार मानले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com