Ajit Pawar
esakal
-मिलिंद संगई
बारामती: आर्थिक बाबतीत शिस्तीचे भोक्ते असलेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या रौद्रावताराला बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकाना सामोरे जावे लागले. एका कार्यकर्त्याने दिलेल्या पत्रानंतर माहिती घेताना पेट्रोलपंपाची उधारी दीड कोटी रुपयांची झाल्याचे समजताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा चांगलाच पारा चढला. चुकीचे काम केले तर तुरुंगात पाठवून असा सज्जड दमच त्यांनी संचालक मंडळाला देत याची सविस्तर चौकशी करण्याचे जाहीर केले.