esakal
-कल्याण पाचांगणे
माळेगाव: बारामतीच्या विद्यार्थ्यांनी शिवनगर संस्थेत शिक्षण घेऊन राज्यात, देशातच नव्हे, तर परदेशातसुद्धा रोजगाराची संधी मिळविली आहे. परिणामी शेतकर्यांचे कौटुंबिक राहणीमान तर सुधारलेच, शिवाय परिसरात उद्योग व रोजगार संधीत वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या संस्थेची विकासाची घोडदौड सुरू ठेवण्यासाठी कठोर आर्थिक व कार्यक्षम धोरण स्वीकारणार आहे. त्या पवित्र कामाला विश्वस्त व संचालक मंडळासह सभासदांचे सहकार्य़ मिळावे, असे आवाहन उपाध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांची अनेक वर्षांतील सुमारे ९ कोटींची थकलेली फी, संस्था प्राशनातील महत्त्वाच्या कर्मचार्यांमधील बेजबाबदारपणावर त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली.