esakal | छातीत दुखत आहे.... पुणे पोलिस म्हणतात पुरावा द्या !

बोलून बातमी शोधा

pune police
छातीत दुखत आहे.... पुणे पोलिस म्हणतात पुरावा द्या !
sakal_logo
By
मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

पुणे : नागरिक : छातीत दुखतंय.... अस्वस्थ होतंय... म्हणून हॉस्पिटलमध्ये चाललोय. डॉक्टरांनी बोलवले आहे...

पोलिस : पुरावा दाखवा ..

नागरिक : अहो माझी अ‍ॅंजियोग्राफी झाली आहे, आता अ‍ॅंजिओप्लॅस्टी करायची की नाही ते ठरवायचे आहे.

पोलिस : पुरावा लागेलच, नाही तर सोडणार नाही....या संवादानंतर नागरिक आणि पोलिस कर्मचारी पोचले कोथरूड पोलिस ठाण्यात. वरिष्ठ अधिकाऱयांनी चौकशी केल्यावर नागरिकाला त्याच्या डॉक्टरांकडे जाता आले. या बाबत त्या नागरिकाने पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडेही शुक्रवारी तक्रार केली.

हेही वाचा: पिंपरी चिंचवडमध्ये १,६७,४०२ रुग्ण झाले बरे; कोरोनामुक्तांचे वाढतेय प्रमाण

विनापरवाना रेमडेसिव्हिर दिल्यास मेडिकलचा परवाना होणार रद्दमहाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांना पोलिसांकडून पुराव्याचा अनुभव आला. संभूस यांना 14 एप्रिल रोजी सकाळी अस्वस्थ वाटू लागले. हृदयाचा त्रास असल्यामुळे त्यांनी डॉक्टरांना फोन केला. त्यांनी त्यांना लगेचच दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात येण्यास सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून संभूस यांनी पत्नी आणि मुलीला सोबत घेतले. कोथरूडमधील शिवाजी महाराज पुतळा चौकात सकाळी अकराच्या सुमारास एक फौजदार चार पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने त्यांना अडविले.

संभूस यांनी अस्वस्थ वाटत असल्याने हॉस्पिटलमध्ये निघालो असल्याचे सांगितले. अ‍ॅंजिओग्राफीमध्ये ब्लॉकेज आहेत. पण, सध्या ट्रिटमेंट सुरू आहे. त्यामुळे लगेच पोचणे गरजेचे आहे, असे सांगून त्यांनी त्यांची वैद्यकीय पार्श्वभूमीही सांगितले. मात्र, तेथील कर्मचाऱ्यांनी सोडणार नसल्याचे सांगितले. एका कर्मचाऱ्याने धक्काबुक्की केल्याने संभूस यांनी पोलिस ठाण्यात सोबत येण्यास त्यांना सांगितले. तेथे गेल्यावर वरिष्ठ निरीक्षकांना संभूस यांनी हा प्रकार सांगितला. निरीक्षकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्याची परवानगी दिली. दरम्यान संभूस हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत डॉक्टर निघून गेले होते. त्यामुळे मोबाईलवर बोलून संभूस यांनी उपचार घेतले.

हेही वाचा: विनापरवाना रेमडेसिव्हिर दिल्यास मेडिकलचा परवाना होणार रद्द

या बाबत संभूस यांनी शुक्रवारी (ता. 23) पोलिस आयुक्त अभिताभ गुप्ता यांची भेट घेतली. त्यांनीही हा प्रकार दुर्देवी असल्याचे सांगितले. या वेळी संभूस यांनी आयुक्तांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, मी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. प्रशासन सगळीकडेच वेळेवर पोचू शकत नाही म्हणून राजकीय कार्यकर्त्यांना नागरिकांच्या मदतीसाठी जावे लागते. त्यावेळी पोलिसांनी ओळखपत्र बघून तरी सहकार्य केले पाहिजे. सर्वच राजकीय पक्ष अथवा सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांबाबत पोलिसांनी सकारात्मक भूमिका घ्यायला हवी. अन्यथा नागरिकांच्या मदतीला कोणालाही जाता येणार नाही.

हेही वाचा: शिरूरमध्ये ऑक्सिजनचे दोन नवे प्रकल्प

''प्रश्न मला अडविण्याचा नाही तर, वैद्यकीय उपचारांची गरज असल्यामुळे मी घराबाहेर पडलो होतो. डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे, हे सांगितल्यावर पोलिस आडकाठी करीत होते. जर त्या वेळी काही कमी जास्त झाले असते तर, त्याला जबाबदार कोण, कोथरूड पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आभार. ''

- हेमंत संभूस