संजय राऊतांच्या 'रोखठोक' शैलीला अजित पवारांचं थेट उत्तर

Sanjay_Raut_Ajit_Pawar
Sanjay_Raut_Ajit_Pawar

बारामती (पुणे) : 'महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणीही मिठाचा खडा टाकण्याचे काम करु नये,' अशा स्पष्ट शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार संजय राऊत यांना इशारा दिला आहे. अनिल देशमुख यांना अपघाताने गृहमंत्रीपद दिल्याचे विधान संजय राऊत यांनी केल्यानंतर आज बारामतीत अजित पवार यांना पत्रकारांनी या बाबत विचारणा केली. त्यानंतर अजित पवार यांनी रोखठोक शैलीत राऊत यांना इशारा दिला आहे. 

कॉंग्रेसमध्ये सोनिया गांधी यांना, शिवसेनेत उद्धव ठाकरे यांना तर राष्ट्रवादीत शरद पवार यांना कोणाला मंत्री करायचे याचा अधिकार आहे, त्यामुळे ते या बाबतचा निर्णय घेत असतात. महाविकास आघाडीबद्दल त्रयस्थाने वक्तव्य करणे समजू शकतो, पण घटक असलेल्यांनी अशी विधाने करणे योग्य नाही, अशा शब्दात पवार यांनी या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली. 

दीपाली चव्हाण यांची आत्महत्या अत्यंत दुर्दैवी घटना आहे, प्रत्येक ठिकाणी काम करताना आपल्या सहकाऱ्यांचा मान सन्मान ठेवूनच काम करायला हवे, या प्रकरणात पोलिस योग्य तो तपास करून यातील तथ्य शोधून काढतील. यात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर सरकार कडक कारवाई करेल, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली. 

नागरिकांनी शिस्तीचे पालन करायला हवे, येत्या 2 एप्रिलपर्यंत जर रुग्णसंख्या कमी झाली नाही, तर नाईलाजाने काही कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना दिला आहे. 

बारामतीतील कोरोनाच्या स्थितीबाबत आज पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. शासनाने जे निर्बंध घालून दिलेले आहेत, त्यांचे पालन प्रशासन स्तरावर कडकपणे करण्यासंदर्भात त्यांनी आज अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. 

या बैठकीनंतर माध्यमांशी बोलतानाही अजित पवार यांनी मास्कचा वापर अजूनही लोक करताना दिसत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. कोरोना रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन आपल्या स्तरावर वेगाने काम करते आहे, मात्र नागरिकांनी काळजी घेण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. 

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com