Big Breaking: महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले संकेत

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

पुणे पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारासाठी एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे : दिवाळीनंतर महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ''काही दिवसांत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे पुढील आठ-दहा दिवसात परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल,'' असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.

देहूतील संत तुकोबांचा देऊळवाडा दर्शनासाठी बंद​

दिवाळीमुळे शहराच्या मुख्य बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. पुण्यात बाजीराव रस्ता परिसरातील गर्दी पाहिल्यानंतर कोरोना गर्दीत चेंगरून मेला की काय असे वाटले, असे अजित पवार म्हणताच सभागृहात हशा पिकला. 

पुणे पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारासाठी एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. लाड आणि आसगावकर यांना विजयी करण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं आहे. 

ससूनच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यास विद्यार्थ्यांची धक्काबुक्की; अॅडमीट तरुणीला गेले होते भेटायला​

पवार पुढे म्हणाले, ''युरोपमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. इंग्लंडमध्ये लॉकडाऊन आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून, शक्य तेवढी खबरदारी घेऊनच येणाऱ्या काळात संकटाचा मुकाबला करायचा आहे. एकदा कोरोना झाला म्हणजे पुन्हा होत नाही, हा भ्रम मनातून काढून टाका. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करा, गाफील राहू नका आणि काळजी घ्या.''

 - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy CM Ajit Pawar says will decide on fresh lockdown in next 8 to 10 days