देहूतील संत तुकोबांचा देऊळवाडा दर्शनासाठी बंद

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

संत तुकाराम महाराज संस्थानने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती भाविकांना दिली आहे. गेले आठ महिने बंद असलेली देऊळ भाविकांसाठी शासनाने आठवड्यात उघडली. येत्या 26 नोव्हेंबरला पंढरपूरची कार्तिकी यात्रा आहे. त्यामुळे देहूतही भाविकांची गर्दी होते.
 
देहू : कोरोनाच्या वाढत्या पादुर्भाव आणि पंढरपूर येथील कार्तिकी यात्रेनिमित्त भाविकांची होणारी गर्दी या पार्श्वभूमीवर देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानने येत्या 25 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत तीन दिवस देऊळवाडा दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय़ घेतला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संत तुकाराम महाराज संस्थानने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती भाविकांना दिली आहे. गेले आठ महिने बंद असलेली देऊळ भाविकांसाठी शासनाने आठवड्यात उघडली. येत्या 26 नोव्हेंबरला पंढरपूरची कार्तिकी यात्रा आहे. त्यामुळे देहूतही भाविकांची गर्दी होते.

"मी इथला भाई आहे' अशी धमकी देत मागितली खंडणी  

सध्या​ मात्र कोरोना रुग्णांची संख्या पुणे आणि जिल्ह्यात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे संस्थानने येत्या 25 तारखेपासून संत तुकाराम महाराज देऊळवाडा दर्शनासाठी बंद ठेवणार असल्याचे संस्थानचे अध्यक्ष मधूकर महाराज मोरे, विश्वस्त विशाल महाराज मोरे, संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे यांनी सांगितले.

नदीत बुडून पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sant Tukoba Temple in Dehu is closed due to corona