
Deputy CM Ajit Pawar warns party leaders: “Posts are not permanent, party can take them back.”
Sakal
-कल्याण पाचांगणे
माळेगाव: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह नगरपालिका, नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूका तोंडावर आल्या आहेत. परंतु बारामतीत अपेक्षित पक्ष संघटनेचे काम उभा होत नाही. ५ आॅक्टोंबरपर्यंत बुथ कमट्यांपासून सर्वकाही संघटनेची कामे पुर्ण करा. गाव व शहर निहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घ्या. त्याचा अहवाल मला द्या. हे काम जमत नसेल तर संबंधितांनी माझ्या जीवावर लोकांमध्ये मिरवण्याचे थांबवा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेत जसे तुम्हाला पद दिले तसे काढूनही घेता येते, हे मी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अधिकाराने सांगतो, असा इशारा देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पक्षाच्या पदाधिकार्यांना फैलावर घेतले.