
गोरे आणि अवघडे यांची शनिवारी रात्री ते रविवारी सकाळपर्यंत औंध बीटमार्शल म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
पुणे : औंध येथील एका सोसायटीत घरफोडी करून फरार होत असलेल्या चोरट्यांना पकडण्याऐवजी पळून गेलेल्या दोन पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. या दोन पोलिसांनी चोरटे पळून जात असल्याची नियंत्रण कक्षाला माहिती दिली नसल्याचेही समोर आले आहे. पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दोघांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिस हवालदार प्रवीण रमेश गोरे आणि पोलिस नाईक अनिल दत्तू अवघडे अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत. निलंबन कालावधीत पुणे पोलिस मुख्यालय सोडून जाताना परवानगी घ्यावी आणि पोलिस निरीक्षक यांच्याकडे दररोज हजेरी द्यावी, असे आदेशात म्हटले आहे. गोरे आणि अवघडे यांची शनिवारी रात्री ते रविवारी सकाळपर्यंत औंध बीटमार्शल म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
- Big Breaking : MPSCने परीक्षांबाबत केले सर्वात महत्त्वाचे बदल; वाचा सविस्तर!
रविवारी पहाटे औंध येथील शैलेश टॉवर सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला कोणी तरी मारहाण करत असल्याचा फोन नियंत्रण कक्षात आला होते. त्यामुळे दोघांना घटनास्थळी पाठविण्यात आले होते. त्यावेळी अवघडे यांच्याकडे एसएलआर ही बंदूक होती. ते दुचाकीवरून खाली उतरत असताना सोसायटीतून चार व्यक्ती चाकू, कटावणी, गज घेऊन येत होते. त्यामुळे घाबरून मोरे हे दुचाकी वळवून पळून गेले, तर चोरटे अवघडे यांच्या समोरून पसार झाले.
- नव्या कृषी कायद्यांबाबत भीती ठरतेय खरी; व्यापारी करताहेत शेतकऱ्यांची फसवणूक!
आदेशात काय नमूद आहे?
- अवघडे यांच्याकडे बंदूक असूनही त्यांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला नाही.
- चोरटे पळून जात असल्याची माहिती वॉकीटॉकीवरून नियंत्रण कक्षाला दिली नाही.
- या घटनेत दोघांनी निष्काळजी व भित्रेपणाचे वर्तन केले.
- त्यामुळे पोलिस खात्याची प्रतिमा मलिन झाली.
सहकाऱ्याला एकटेच सोडले :
पोलिस पळून गेल्याने घरफोडीतील मुद्देमाल घेऊन चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून चोरटे मुद्देमाल घेऊन जाताना त्यात दिसत आहेत. गोरे हे आरोपींना पाहून दुचाकीवरून पळून जाताना स्पष्ट दिसत आहेत. तर, घटनास्थळापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या दुसऱ्या सीसीटीव्हीत गोरे हे आरोपींची कार निघून जाण्याअगोदरच सहकारी अवघडे यांना सोडून पळून गेल्याचे दिसत आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)