'डेक्कन एज्युकेशन'चे कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 मार्च 2020

डॉ. कानेटकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सांगली जिल्हा कार्यवाह म्हणून जबाबदारी पार पाडली. पुण्यातील रा. स्व. संघाच्या विद्यापीठ भागाचे ते सहकार्यवाह होते.

पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे (डीईएस) कार्यवाह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक डॉ. श्रीकृष्ण नीळकंठ कानेटकर (वय ६१) यांचे आज दुपारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सन १९९९-२०००, सन २००९ ते २०१३ आणि १ जानेवारी २०१९ पासून आजपर्यंत कानेटकर यांनी डीईएसचे कार्यवाह म्हणून जबाबदारी पार पाडली. ते डीईएसचे आजीव सभासद होते. जगन्नाथ राठी व्होकेशनल गायडन्स ऍण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे (जेआरव्हीजीटीआय) संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले.

- राष्ट्रवादीने प्रदेश उपाध्यक्षाला केले निलंबित; खंडणी प्रकरणात होतेय चौकशी​

डॉ. कानेटकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सांगली जिल्हा कार्यवाह म्हणून जबाबदारी पार पाडली. पुण्यातील रा. स्व. संघाच्या विद्यापीठ भागाचे ते सहकार्यवाह होते. संघाच्या ‘सांस्कृतिक वार्तापत्रा’चे कार्यवाह म्हणून त्यांनी काम पाहिले. घोष विभागातील स्वयंसेवक म्हणून त्यांची ओळख होती.

- कोरोनाच्या धास्तीमुळे RSS ने घेतला महत्त्वाचा निर्णय!

डॉ. कानेटकर यांनी १९८१ मध्ये कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून ‘इन्व्हायरनमेंटल मायक्रोबायोलॉजी‘ या विषयातील एम. एस्सी. पीएच. डी. पदवी संपादन केली होती. महाविद्यालयीन जीवनात विभागीय क्रिकेट स्पर्धेत त्यांनी सायन्स कॉलेज, कराडचे प्रतिनिधित्व केले. या संघाचे ते दोन वर्षे कर्णधार होते.

- Coronavirus : राज्य सरकारचा मोठा निर्णय; शाळा-महाविद्यालये बंद म्हणजे बंद!​

डेक्कन एज्युकेशन सोसायटीतील महाविद्यालयांमध्ये २६ वर्षे पदवीपर्यंतच्या आणि ८ वर्षे पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचा त्यांचा अनुभव होता. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती सुभद्रा के. जिंदाल कॉलेज ऑफ नर्सिंग आणि श्री ब्रिजलाल जिंदाल कॉलेज ऑफ फिजिओथेरपी या दोन संस्था सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या पश्‍चात मुलगा, सून, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DES proceedings Dr Shrikrishna Kanetkar passed away at 61