esakal | ''आर्थिक तोटा झाला तरी, मी अजून खचलो नाही कारण मी अजून जिवंत आहे''

बोलून बातमी शोधा

sanjay Radand cloth showroom owner
''आर्थिक तोटा झाला तरी, मी अजून खचलो नाही कारण मी अजून जिवंत आहे''
sakal_logo
By
महेश जगताप

स्वारगेट : ''सहा, सात वर्षांपूर्वी मी लातूरहून पुणे शहरात व्यवसाय करण्यासाठी स्थायिक झालो. या शहरात मी कापड व्यवसायाची दोन शोरूम उघडली. एक लक्ष्मी रास्ता आणि दुसरं ढोले पाटील रास्ता दोन्हीही दुकाने छान चालली होती. पण, गेल्या वर्षभरापासून कोरोनाने थोडसं आम्हाला या व्यवसायात मागे खेचले. लक्ष्मी रस्त्यावर असणाऱ्या कापडाच्या दुकानाला दोन लाख रुपये भाडे होते. सुरवातीचे ,आठ महिने तोटा सहन केला पण, गेल्या महिन्यात राज्यभरातील एकूण सात कपड्यांच्या शोरूम पैकी चार शोरूम बंद करावे लागले.त्यामध्ये लक्ष्मी रस्त्यावर असणार लिनन होग हे शोरूमही बंद कराव लागलं पण, मी बिलकुल खचलेलो नाही. ही कठीण वेळ निघून जाणार आहे. पुन्हा नव्या दमाने नवीन कपड्यांची शोरूम सुरू करणार आहे'' असा आशावादी सूर शोरूमचे मालक संजय रादंड यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केला .

हेही वाचा: दक्षिण मुख्यालयाचा मदतीचा हात

एक वर्षापासून कोरोनाने देशभरात थैमान घातले आहे. याचा फटका अनेक उद्योग व्यवसायास बसला. तसाच कापड व्यवसायास ही मोठ्या प्रमाणात खीळ बसली. गेल्या वर्षभरात देशात सतत लॉकडाऊन आणि रोगराईने त्रस्त झालेले नागरिक यामुळे साहजिकच कापड व्यवसायाच्या अर्थकरणास फटका बसला. गेल्यावर्षी आणि यावर्षीची लग्नसराई कोरोनात गेली असल्याने त्याचा फटका कापड व्यवसायास बसला पण, जरी चार कापडांची शोरूम रादंड यांना बंद करावी लागली असली तरी ते खचून गेले नाहीत. ''हे शोरूम मीच उभे केले होते आणि हा कठीण काळ गेल्यानंतरही मीच उभी करणार आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जायचं कारण नाही. कठीण वेळ येते आणि जाते त्यामुळे आलेल्या संकटासमोर खचून न जाता पुन्हा एकदा आपल्याला नव्या जोमाने उभे राहावे लागेल'' असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: विवाहबाह्य प्रेमप्रकरणातून केला बायको-मुलाचा खून; पतीची कबूली

''हे शोरूम बंद केल्यामुळे याचा आम्हला निश्चित फटका बसला पण मालकांनी आम्हाला वेळोवेळी आलेल्या आर्थिक अडचणींना मदत केली. अश्या पद्धतीने सर्वच उद्योग व्यवसायाच्या मालकांनी कामगारांना समजून घ्यावे. कारण पुन्हा उधोगधंदे सुरू होणारच आहेत आणि पुन्हा कामगारांची ही गरज लागणारच आहे.''

- अस्लम शेख (कामगार लिनन होग )