esakal | दक्षिण मुख्यालयाचा मदतीचा हात

बोलून बातमी शोधा

वानवडी ः जुन्या कमांड रुग्णालयातील कोविड सेंटरला दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांनी भेट देऊन कार्याचा आढावा घेतला.
दक्षिण मुख्यालयाचा मदतीचा हात
sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

पुणे ः देशात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता पुण्यातील दक्षिण मुख्यालयाच्या वतीने प्रशासनाच्या मदतीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. याच अनुषंगाने दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांनी मंगळवारी वानवडी येथील लष्कराच्या जुन्या कमांड रुग्णालयाला भेट दिली. तसेच तेथील कामाचा आढावा घेतला.

हेही वाचा: Success Story : निमोण्यातून ‘ड्रॅगन’ शेतीचा ‘अरुणोदय’

सामान्य नागरिकांना उपचार मिळावा यासाठी वानवडी येथील हे जुने कमांड रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. शहरात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरवात झाली. दररोज बाधितांच्या वाढत्या आलेखामुळे शहरातील सरकारी रुग्णालयाबरोबर खासगी रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता भासू लागली. अशा परिस्थितीमध्ये सामान्य नागरिकांना कोरोनाचे उपचार वेळेत मिळावे तसेच प्रशासनावरील ताण कमी करण्याच्या हेतूने दक्षिण मुख्यालयातर्फे या कमांड रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्यात आले. तर जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत संदर्भित केलेल्या सामान्य रुग्णांच्या उपचारासाठी या रुग्णालयात पर्याप्त क्षमता निर्माण करण्यात आली असून तज्ज्ञ डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नेमण्यात आले आहे.

हेही वाचा: कोविड केअर सेंटरची सुरक्षा 'राम भरोसे'; पाहणीविनाच परवानगी

या रुग्णालयातील कार्य सुरळीतपणे सुरू आहे का?, याची पाहणी मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट नैन यांनी केली. यावेळी त्यांनी रुग्णालयात वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि कोरोनाच्या आजाराविरुद्ध लढाईत देत असलेल्या सेवाकार्याबद्दल त्यांचे कौतुक केले. कोरोनाच्या या कठीण काळात लष्कराच्या वतीने सध्या विविध शहरांमध्ये सेवा कार्य करण्यात येत आहे. यामध्ये अहमदाबाद येथे ९०० बेडचे रुग्णालय, राजस्थान येथे १०० बेडची अलगीकरण सुविधा, तसेच मध्य प्रदेश येथेही विविध ठिकाणी अशा प्रकारची सुविधा उभारण्यात आली आहे. सतत पाहणी आणि अधिक क्षमतेच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दक्षिण भारतातील सर्व राज्यांमध्ये सुविधा उभारण्याचे कार्य सुरू आहे.

हेही वाचा: लसीकरण होईपर्यंत प्राथमिक शिक्षकांना कोविड संदर्भातील कामे देऊ नयेत

राज्य सरकारला वैद्यकीय सेवेसाठी मदत पुरविण्याच्या अनुषंगाने तसेच शहरातील नागरिकांसाठी आम्ही वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर कोरोनाबाधित रुग्णांसाठी डॉक्टर्स आणि परिचारिकांचा चमू या रुग्णालयात सज्ज आहे.

- लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन, प्रमुख, दक्षिण मुख्यालय