विवाहबाह्य प्रेमप्रकरणातून केला बायको-मुलाचा खून; पतीची कबूली

यवत पोलिसांनी 24 तासांतच लावला आरोपींचा शोध
crime
crimeSakal Media
Updated on

पाटस ः पाटस (ता. दौंड) येथे मंगळवारी (ता. २७) सकाळी एका घरात आईसह सात वर्षांच्या मुलाचा छताला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा यवत पोलिसांनी मोठया शिताफिने काही तासांतच पर्दाफाश केला. ही आत्महत्या नसून पतीने प्रियसीच्या मदतीने पत्नी व मुलाचा खून केल्याचे तपासात समोर आले.

crime
पुणे महापालिका रुग्णालयांसाठी ८०० रेमडेसिव्हिर

दरम्यान, लिना सचिन सोनवणे तसेच ओम सचिन सोनवणे दोघेही (रा. पाटस, ता. दौंड, जि. पुणे) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह दोन महिलांवर खुनाचा गुन्हा दाखल केला. पती सचिन दिलीप सोनवणे (वय ३७), प्रियसी रेणुका उर्फे प्रणाली भारत तळेकर (वय २२) दोघेही (रा. मांजरी, ता. हवेली ) तसेच एक अनोळखी महिला (नाव व पत्ता समजला नाही) अशी त्यांची नावे आहेत.

लिना सचिन सोनवणे या मुलगा ओम व मुलगी वैष्णवी यांच्या सोबत पाटस येथे एका सदनिकेत राहत होत्या. मंगळवारी (ता. २७) सकाळी लिना व ओम यांचा छताला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या बाबत मुलगी वैष्णवी हिने नातेवाईकांना माहिती दिली. दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी राहूल धस, पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलिस उपनिरीक्षक सचिन नागरगोजे, उपनिरीक्षक रामभाऊ घाडगे, पोलिस हवालदार प्रदिप काळे, पोलिस नाईक विजय भापकर यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. यावेळी नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी सखोल चौकशी करण्याची मागणी नातेवाईकांनी केली.

crime
बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर

यवत पोलिसांनी मोठया शिताफिने घटनेचा तपास सुरु केला. पोलिसांनी संशयावरुन पती सचिन याला ताब्यात घेतले. चौकशीत सचिन याने गुन्ह्याची कबूली दिली. सचिन व लिना हे मागील अंदाजे चार वर्षांपासून विभक्त राहत होते. तो पत्नी लिना हिला सतत सोडचिठ्ठी मागत होता. मात्र, त्याबाबत ती टाळाटाळ करीत होती. मंगळवारी (ता. २७) रात्री आरोपी पती सचिन व प्रियसी रेणूका हे पाटस येथे लिनाच्या राहत्या घरी आले. यावेळी त्यांच्या सोबत आणखी एक महिला होती. त्यांनी लिना हिचा गळा दाबून खून केला. तसेच मुलगा हा जागा झाल्याने त्याचाही गळा दाबून खून केला. मुलगी वैष्णवी हिचा तोंडावर उशी ठेवून खून करण्याचा पयत्न केला. आत्महत्या दाखविण्यासाठी आरोपींनी मृत लिना व ओम यांच्या गळ्याला दोरी बांधून मृतदेह छताला लटकविला. या प्रकरणी पोलिसांनी सदर संशयित आरोपींविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करुन सचिन व रेणुका हिला अटक केली. बुधवारी (ता. २८) दुपारी दौंड न्यायालयात हजर केले असता, संशयित आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

crime
पुणे महापालिका रुग्णालयांसाठी ८०० रेमडेसिव्हिर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune District Grieves the Demise of Former Zilla Parishad Chief Jalindar Kamthe
Agriculture Day celebrated at Ghodegao, Ambegaon with a focus on modern farming techniques and farmer recognition
Three Held, Minor Detained as Pune Police Solve Nine Burglary Cases Across Two States
From Darkness to Light: Eye Donation Ends Six Decades of Blindness
Marathi News Esakal
www.esakal.com