Fire
Fire Sakal

तळेगाव ढमढेरे येथे फर्निचरच्या गोडाऊनला आगीत खाक

सुमारे २५ लाखाचे नुकसान झाले

तळेगाव ढमढेरे - तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील जय गुरुदत्त फर्निचरच्या गोडाऊनला आज दुपारच्या सुमारास आग लागून सुमारे २५ लाखाचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. यासंदर्भात फर्निचर गोडाऊनचे मालक मनीष महेश मेटे यांनी माहिती दिली. फर्निचरच्या गोडाऊनमध्ये असलेले सर्व लाकडी व लोखंडी साहित्याचे फर्निचर तसेच हार्डवेअर व विविध प्रकारच्या मशीन तसेच एक दुचाकी आणि पत्रा शेड आदी मालमत्ता जळून खाक झाली आहे. आगीची माहिती मिळताच गावातील नागरिक व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात घटनास्थळी जमा झाले. यामध्ये संजय गांधी योजनेचे तालुकाध्यक्ष ॲड सुदीप गुंदेचा, माजी अध्यक्ष संदिपअण्णा ढमढेरे, चिंतामण ढमढेरे, पोलीस पाटील पांडुरंग नरके, माजी उपसरपंच प्रमोद ढवळे , रोहिदास ढमढेरे, हरिभाऊ ढमढेरे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.

आगीची माहिती कळताच रांजणगाव एमआयडीसीतील अग्निशमन दल व पीएमआरडीए च्या अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र उष्णतेमुळे आगीने रुद्र रूप धारण केले होते. अग्निशमन दलाला दोन तासात आग विझवण्यात यश आले. या आगीमध्ये सर्व फर्निचर जळून खाक झाले असून सुदैवाने जीवित हानी झाली नाही. दरम्यान, तळेगाव ढमढेरे येथे गेल्या पंधरा दिवसातील ही दुकानाला लागलेली दुसरी आग असून पंधरा दिवसापूर्वी मुख्य बाजारपेठेतील एका घराला आग लागून मोठे नुकसान झाले होते.

१५ दिवसानंतर आज पुन्हा मुख्य बाजारपेठेतील फर्निचरच्या गोडाऊनला आग लागल्याने नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन त्वरित पंचनामा करावा आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मनिष मेटे यांनी केली आहे. दरम्यान, आगीच्या संदर्भात ॲड. सुदीप गुंदेचा यांनी आमदार अशोक पवार यांच्याशी संपर्क साधला आणि आमदार अशोक पवार यांनी फोनवरून संपर्क करून रांजणगाव एमआयडीसी व पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाला त्वरित पाचारण केल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com