संतापजनक! अज्ञातांकडून तोरणा किल्ल्यावरील बुरुजाची नासधूस

fort
fort
Summary

वेल्हे तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले तोरणागडावरील बुधलामाचीकडे जाणा-या कोकण बुरुजाचे दगडी पाडून नासधुस केल्याचा प्रकार आज (ता.०६ ) समोर आला

वेल्हे तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले तोरणागडावरील बुधलामाचीकडे जाणा-या कोकण बुरुजाचे दगडी पाडून नासधुस केल्याचा प्रकार आज (ता.०६ ) समोर आला. किल्ल्यावरील पुरातत्व खात्याचे किल्लेदार बापु साबळे हे सकाळी किल्ल्यावर पाहणी करत असताना हे घडल्याचे निदर्शनास आले. कोरोना कालावधीमध्ये संचारबंदी असताना शिवराज्यभिषेक दिनी किल्ले तोरणा व किल्ले राजगडावर शेकडो पर्यटकांनी हजेरी लावली होती. या किल्ल्यावर जाण्यासाठी गडांच्या चोहोबाजुने वाटा असल्याने अनेक पर्यटक किल्ल्यावर सुट्टीच्या दिवशी येत असतात. या पर्यटकांमध्ये काही हौशी नवसे-गवसे असे पर्यटक असतात. (Destruction on Torna fort by unknown persons velhe)

तोरणा किल्ल्यावर दोनशे ते अडीशचे पर्यटक किल्ल्यावर होते. त्यापैकी काही जण रात्री किल्ल्यावर मुक्कामी होते. याची माहिती किल्लेदार बापु साबळे यांनी दिली. ते म्हणाले ,काल (ता.५) रोजी किल्ल्याची पाहणी करुन गडावरुन खाली येताना किल्ला सुस्थितीत होता. परंतु आज सकाळी गडाची पाहणी करताना बुधला माचीकडे जाणारा कोकण दरवाज्या मार्गावरील कोकण बुरुजाच्या दगडी, तसेच पायाखालील दगडी फरश्या, उभ्या भिंतीच्या दगडी उपद्रवी पर्यटकांनी पहारीच्या सहाय्याने पाडल्या असल्याचे निर्दर्शनास आले. याबाबत पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालकांना याबाबत माहिती दिली असल्याचे साबळे यांनी सांगितले.

fort
मोठी बातमी! नरेंद्र मोदी आज जनतेशी संवाद साधणार

किल्ले तोरणा व राजगडावर सुटीच्या दिवसांबरोबर दररोजही शेकडो पर्यटक येत असतात. किल्ल्यांवर येणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. परंतु किल्ल्यांवर आलेल्यांची नोंद होणे गरजेचे आहे. त्यामुळे असा प्रकार घडल्यास उपद्रवी पर्यटकांवर कारवाई करणे सोपे जाईल,गोरक्ष भुरुकचे स्थानिक नागरिक विकास गायखे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com