दहावी-बारावीच्या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक मंगळवारपासून संकेतस्थळावर

बारावीची परीक्षा ४ मार्चपासून, तर दहावीची परीक्षा ४ एप्रिलपासून सुरू होणार आहे.
Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education
Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Educationsakal

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे(Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) मार्च-एप्रिल २०२२ मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेचे दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या अधिकृत संकेतस्थळावर मंगळवारपासून उपलब्ध होणार आहे. बारावीची परीक्षा ४ मार्चपासून, तर दहावीची परीक्षा ४ एप्रिलपासून सुरू होणार आहे.मार्च-एप्रिल २०२२मध्ये राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या लेखी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक मंडळातर्फे जाहीर करण्यात येत आहे.

Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education
पुणे : जिल्हा बँकेच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा

मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले, तसेच व्हॉट्‌सॲप किंवा तत्सम माध्यमातून प्रसारित झालेले वेळापत्रक ग्राह्य धरण्यात येऊ नये. प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येईल, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

दहावी-बारावी लेखी परीक्षेचा कालावधी

बारावीची परीक्षा : ४ मार्च ते ३० मार्च २०२२

दहावीची परीक्षा : १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२

परीक्षेचे वेळापत्रक पाहण्यासाठी संकेतस्थळ : www.mahahsscboard.in

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com