पिंपरीत अल्पवयीन मुलीशी अश्‍लील चाळे करणारा अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 डिसेंबर 2019

रविवारी (ता. 15) सकाळी अकराच्या सुमारास आरोपीने अल्पवयीन मुलीस धाक दाखवून शिवगणेश नगर येथील एका इमारतीच्या टेरेसवर नेले. तेथे मुलीशी अश्‍लील चाळे करीत तिच्याशी झटापटी केली.​

पिंपरी : अल्पवयीन मुलीशी अश्‍लील चाळे केल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना भोसरी येथे घडली. लियाकत अली खान (वय 55, रा. शिवगणेश नगर, धावडे वस्ती, भोसरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

Social Viral:उकळत्या पाण्यात बसला मुलगा; फेसबुकवर फसवेगिरीचा भांडाफोड

रविवारी (ता. 15) सकाळी अकराच्या सुमारास आरोपीने अल्पवयीन मुलीस धाक दाखवून शिवगणेश नगर येथील एका इमारतीच्या टेरेसवर नेले. तेथे मुलीशी अश्‍लील चाळे करीत तिच्याशी झटापटी केली.

पिंपरी : स्कूल बसमध्ये विद्यार्थिनीशी अश्‍लिल चाळे; चालकावर गुन्हा दाखल

याबाबत मुलीने पालकांना सांगितल्यानंतर मुलीच्या आईने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी खान याच्यावर बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Detained for sexually assaulting a minor girl