Pune | 'देव बिव’ या पुण्यातील मंदिरांच्या रंजक कथा सांगणा-या प्रदर्शनाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganpati
'देव बिव’ या पुण्यातील मंदिरांच्या रंजक कथा सांगणा-या प्रदर्शनाचे आयोजन

'देव बिव’ या पुण्यातील मंदिरांच्या रंजक कथा सांगणा-या प्रदर्शनाचे आयोजन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुण्यातील तेजस गोखले या तरुणाने आपल्या खलबत्ता या उपक्रमा अंतर्गत पुण्यातील विविध मंदिरांची चित्रे व त्यामागील रंजककथा सांगणा-या ‘देव बिव’ या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

येत्या शनिवार दि. २७ व रविवार दि. २८ नोव्हेंबर रोजी भांडारकर रस्त्यावरील आर्ट टू डे गॅलरी येथे सकाळी १०.३० ते रात्रौ ८.३० या वेळेत सदर प्रदर्शन रसिकांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या उपस्थितीत होईल.

हेही वाचा: महापालिका आणि पाटबंधारे साधणार कामात समन्वय

मराठी भाषेसाठी काहीतरी करावे, या उद्देशाने आम्ही 'खलबत्ता' या उपक्रमाला सुरुवात केली असे सांगत तेजस गोखले म्हणाले, “पुणे शहराला मोठा इतिहास आहे. त्यामुळे येथील मंदिरे देखील तितकीच जुनी आणि हटके नावं असलेली आहेत. मराठी भाषेत त्यातही नव्या पिढीपर्यंत या मंदिरांच्या नावामागील रंजक कथा पोहोचाव्या या हेतूने आम्ही हे प्रदर्शन आयोजित करीत आहोत. या प्रदर्शनामध्ये शहरांतील २९ चित्रविचित्र नावे असलेल्या देवांच्या नावामागील रंजक कथा आम्ही मांडणार आहोत. या सांगताना त्या अवजड भाषेत न सांगता अगदी १० ते १२ ओळींमध्ये सांगितल्या आहेत.”

‘देव – बिव’ प्रदर्शनामध्ये पुण्यातील जिलब्या, भांग्या, पावट्या, खुन्या ही नावं मानाने मिरवणारे मारुती, गणपती, कृष्ण, राम, दत्त यांच्या नावांमागील रंजक कथा, चित्रे आणि दृकश्राव्य (audio visuals) स्वरूपात पाहता येणार आहेत.

loading image
go to top