‘देव’, ‘दर्शन’ शिकताहेत महापालिका शाळेत

मोहननगर - दीपक जाधव यांच्यासोबत मुले देव आणि दर्शन.
मोहननगर - दीपक जाधव यांच्यासोबत मुले देव आणि दर्शन.

पिंपरी - आज बहुतांश सुशिक्षित मध्यमवर्गीय तसेच उच्चभ्रू पालक आपल्या मुलांना कॉन्व्हेंट शाळेत दाखल करतात.  महापालिका शाळा हा पर्यायच स्वीकारण्याचे धारिष्ट्य नसते. मात्र या सार्वत्रिक स्थितीला वैशाली आणि दीपक जाधव हे शिक्षक दांपत्य अपवाद ठरले आहे. ते दोघेही खासगी शाळेत अध्यापन करतात. आर्थिक परिस्थितीदेखील उत्तम असूनही त्यांनी आपल्या देव आणि दर्शन या मुलांना महापालिकेच्या शाळेमध्ये दाखल करून समाजासमोर आदर्श ठेवला आहे.

आपल्या पाल्याने चांगल्या आणि महागड्या इंग्रजी शिक्षण संस्थेत शिकावे, हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. अनेक पालकांचा तर तो ‘स्टेट्‌स’चा प्रश्‍न असतो. महापालिका शाळांमधील शिक्षकांचे मुले इंग्रजी शाळेत शिक्षण घेतात. अशा परिस्थितीत पेशाने शिक्षक असलेले दीपक जाधव रूपीनगरमधील ज्ञानप्रभात शाळेत अध्यापन करतात. त्याचे जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण पूर्ण करत सायन्स डीएड झाले आहे. त्यांच्या पत्नी वैशाली महापालिकेच्या शाळेत शिकल्या असून, त्या आता ‘सेव्ह द चिल्ड्रन’ संस्थेत मुख्य पर्यवेक्षिका आहेत.

‘पतंग’वर्गातून अप्रगत मुलांसाठी काम करत आहेत. हे काम करत असताना महापालिका आणि खासगी शाळांमधील फरक जवळून पाहिल्याचे त्या सांगतात. त्या म्हणाल्या, ‘‘महापालिका शाळा सुसज्ज, प्रशस्त आहेत. बसण्यासाठी सुटसुटीत जागा आहे, जी खासगी शाळेत नाही. अगदी कोंडवाड्यात भरल्यासारखी मुले बसलेली असतात. त्यामुळे प्रत्येक मुलापर्यंत शिक्षकांना पोचता येत नाही. महापालिका शाळांमध्ये याउलट चित्र आहे. अनेक जण महापालिका शाळेत शिकून घडल्याचे ऐकिवात आहे. त्यामुळे आम्ही मुलांना महापालिका शाळेतच शिकवणार असल्याचा निर्धार केला आणि निर्णय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com