

Tribal Development Department Launches Devarai Conservation Scheme
Sakal
घोडेगाव : पुणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील निसर्गदत्त वारसा असलेल्या देवरायांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने पाऊल उचलले आहे. 'देवराई संरक्षण व संवर्धन योजने'अंतर्गत आंबेगाव, जुन्नर आणि खेड तालुक्यातील पाच गावांसाठी प्रत्येकी १ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यामुळे जैवविविधतेच्या जतनाला मोठी चालना मिळणार आहे.