विकासाचा व्हायरस आता देशभर पसरेल : रोहित पवार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 February 2020

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने विकासाबाबतचा कार्यक्रम तयार केला आहे. या विकासाला मतदारांकडूनही पसंती मिळत आहे. म्हणूनच राज्यातील सत्ता स्थापनेनंतर मतदारांनी झारखंड आणि दिल्लीमध्ये विकासाला भरभरून साथ दिली आहे. परिणामी भारतीय जनता पक्ष या दोन्ही राज्यात सपशेल अपयशी ठरला आहे. विकासाचा हा व्हायरस आता देशभर पसरेल, आशा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.

पुणे : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने विकासाबाबतचा कार्यक्रम तयार केला आहे. या विकासाला मतदारांकडूनही पसंती मिळत आहे. म्हणूनच राज्यातील सत्ता स्थापनेनंतर मतदारांनी झारखंड आणि दिल्लीमध्ये विकासाला भरभरून साथ दिली आहे. परिणामी भारतीय जनता पक्ष या दोन्ही राज्यात सपशेल अपयशी ठरला आहे. विकासाचा हा व्हायरस आता देशभर पसरेल, आशा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आमदार पवार यांनी मंगळवारी (ता.11) पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. कर्नाटकच्या धरतीवर महाराष्ट्रातही ऑपरेशन कमळ ही मोहीम राबविणार आणि येत्या डिसेंबरमध्ये महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होणार, या भाजपच्या केवळ वल्गना आहेत. भाजपमधील नेते आणि कार्यकर्त्यांमधील चुळबूळ शांत करण्यासाठी त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी भाजपकडून या वल्गना जाणीवपूर्वक केल्या जात असल्याचा आरोप करत, महाराष्ट्रात पाच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार टिकेल, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कर्जत-जामखेड विकासासाठी एकात्मिक विकास संस्थेची स्थापना

पवार म्हणाले, "विकासाला मतदारांची साथ मिळते, हेच झारखंड आणि दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. देशातील सोळा राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते, बारा मुख्यमंत्री, तेवढेच माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, 370 खासदार आणि तेवढेच आमदार दिल्ली  विधानसभा निवडणुकीसाठी दिल्लीत तळ ठोकून होते. गल्लोगल्ली जाऊन भाजपचा प्रचार करत होते. यामध्ये महाराष्ट्रात ज्यांना त्यांच्या नेत्यांनी उमेदवारी नाकारली (तावडे यांचे नाव न घेता) असेही नेतेही प्रचार करत होते. तरीही दिल्लीत भाजपला केवळ सात जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे विकासाचा हा व्हायरस आता टप्प्याटप्याने देशभर पसरणार आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: development virus will now spread across the country Says MLA rohit Pawar