कर्जत-जामखेड विकासासाठी एकात्मिक विकास संस्थेची स्थापना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

  • आमदार रोहित पवार यांची माहिती
  • येत्या शनिवारी पुण्यात उद्‌घाटन

पुणे : नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी "कर्जत -जामखेड एकात्मिक विकास संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेच्यावतीने नागरिक, राज्य सरकार व सामाजिक उत्तरदायित्व निधीअंतर्गत (सीएसआर) मतदारसंघाच्या विकासाला गती देण्यात येणार आहे. यामुळे देशात हा विधानसभा मतदारसंघ एक बॅंड होऊ शकेल, अशी अपेक्षा व्यक्त अशा पद्धतीचा हा देशातील पहिलाच प्रयोग असल्याचे या मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी (ता.11) पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते येत्या शनिवारी (ता.15 फेब्रुवारी) पुण्यात या उपक्रमाचे उद्‌घाटन केले जाणार आहे. पुण्यातील मगरपट्टा येथील लक्ष्मी लॉन्स येथे दुपारी साडेचार वाजता या उद्‌घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, पर्यटन सचिव वलसा नायर सिंग, चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, उद्योजिका दीपशिखा देशमुख आणि अभिनेते मिलिंद गुणाजी आदी उपस्थित राहणार आहेत.

खूशखबर ! या कंपनीत आहे २० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती

पवार म्हणाले, "या संस्थेच्यावतीने कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघातील विकासकामांना नागरिक, स्वयंसेवक, राज्य सरकार व विविध कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी आदी विविध घटकांच्या मदतीने विकासकामे केली जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, जलसंधारण, महिला सक्षमीकरण व पर्यटन यांसारख्या विषयांवर भर देऊन मतदार संघाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जाईल. एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून अभ्यास केला. या अभ्यासात या भागातील नागरिक, सरकार व कंपन्यांचे सीएसआर यांच्या माध्यमातून विकासाला गती देता येऊ शकतील, हे दिसून आले. सर्वांत पहिल्यांदा पर्यटनावरील काम सुरू करणार आहोत. पर्यटनाला चालना दिल्यास स्थानिक युवक, महिला यांच्या विकासाला गती मिळू शकेल.''

Delhi Election : तिवारी म्हणाले होते 'ट्विट जपून ठेवा'; निकालनंतर होतायेत ट्रोल

याबरोबरच मतदारसंघासाठी खास संकेतस्थळ सुरू करण्यात येणार आहे. या संकेतस्थळावर कर्जत जामखेडला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने माहिती दिली जाणार आहे. यावेळी या उपक्रमाच्या पर्यटनविषयक समन्वयक देवयानी पवार याही उपस्थित होत्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Establishment of Integrated Development Agency for development of Karjat-Jamkhed