Video : किल्ले लग्नासाठी देण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण; म्हणाले...

अमोल कविटकर
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

गड आणि किल्ले हे ठेकेदारांना देऊन तेथे लग्न समारंभासाठी देण्यासंदर्भातील बातमी अतिशय चुकीची बातमी असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदवी स्वराजाच्या किल्ल्यांना नखभरही हात लावू देणार नाही, असा दावा केला.

पुणे : गड आणि किल्ले हे ठेकेदारांना देऊन तेथे लग्न समारंभासाठी देण्यासंदर्भातील बातमी अतिशय चुकीची बातमी असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदवी स्वराजाच्या किल्ल्यांना नखभरही हात लावू देणार नाही, असा दावा केला.

छत्रपतींचे किल्ले देणार लग्नकार्यासाठी; सरकारचा निर्णय

गड आणि किल्ल्यांच्या मुद्यावरून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. धनंजय मुंडे, अमोल कोल्हे यांनी सरकारवर कठोर टीका केली. यावर सरकारकडून सारवासारव करण्यात येत आहे. फडणवीस आज पुण्यातील गणेश मंडळांना भेटी देण्यासाठी आले होते. या वेळी त्यांनी या विषयावर सरकारची भूमिका स्पष्ट केली.

गडकिल्ल्यांबाबत शिवेंद्रराजे म्हणतात...

छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासासंबंधीत कोणत्याही गोष्टीला कधीच परवानगी मिळणार नाही, हे सगळे संरक्षित किल्ले असल्याचे त्यांनी सांगितले.  स्वराज्याची राजधानी रायगडावर आमच्या सरकारने ज्या पद्धतीने विकास केला, यापूर्वी कोणत्याही सरकारने त्याकडे कधीही लक्ष दिले नसल्याचा दावा त्यांनी केला. खासदार छत्रपती संभाजी महाराजांनी लक्ष घालून हे काम केलेले आहे. आम्हाला इतिहासच जतन करायचा आहे, अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले.

गडकिल्यावर लग्नसामारंभ या निर्णयावर संभाजीराजे म्हणतात...

जो काही निर्णय झाला, तो ऐतिहासिक किल्ल्यांव्यतिरिक्त जे काही किल्ले आहे, ज्यांचा इतिहास अस्तित्वात नाही, ज्याच्या केवळ चार भिंती आहे. त्या ठिकाणी काही पर्यटनाच्या दृष्टीने करता येईल का? असा निर्णय होता. तिथं काय लग्न करायचे आहेत, समारंभ करायचे त्याला काही अर्थ नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devendra fadanavis clarifies about fort policy