केंद्राने मदत करावी हा शरद पवारांचा मुद्दा दुटप्पीपणाचा : देवेंद्र फडणवीस

सावता नवले
Monday, 19 October 2020

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त गावांचा देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर जहरी टीका केली.

कुरकुंभ : राज्यातील राजकीयदृष्टया वजनदार अशा पश्चिम महाराष्ट्रात आठ दिवस झाले अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त जनतेचे प्रशासनाकडून पंचनामे तसेच रस्ते, वीज, पिण्याच्या पाण्यासारख्या मुलभूत गरजा पूर्ण होऊ शकल्या नाहीत तर मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकणची काय अवस्था असेल याची कल्पनाच न केलेली बरी अशी जहरी टीका उद्धव ठाकरे सरकारवर विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त गावांचा दौरा करताना बोलत होते. त्याच्या समवेत विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, माढयाचे खासदार रणजित नाईक निंबाळकर, आमदार राहुल कुल, जयकुमार गोरे, राम सातपुते, गोपीचंद पडळकर, माजी मंत्री बाळा भेगडे,  भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस वासुदेव काळे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे-दौंड लोकल उद्यापासून सुरू होण्याची शक्यता

फडणवीस पुढे म्हणाले, ''केंद्राने मदत केली पाहिजे हा शरद पवारांचा मुद्दा योग्य आहे. मात्र तो दुटप्पीपणाचा आहे. केंद्रातून मोदीजी मदत करतीलही मग राज्य सरकार काय करते हा प्रश्न पवार साहेबांनी राज्य सरकारला विचारावा. केंद्राची मदत मिळविण्यासाठी काय करावे लागते हे मुख्यमंत्री, केंद्रीय कृषिमंत्री, आपत्कालीन समितीचे अध्यक्ष राहिलेल्या पवार साहेबांना चांगलंच माहीत आहे. ही मदत यायला काही कालावधी लागेल, तोपर्यंत मदतीची वाट नुकसानग्रस्त जनतेने पाहिला लावणे चुकीचे आहे. मशागती, जमिनी दुरूस्ती, नवीन लागवड यासाठी शेतकऱ्यांच्या खिशात पैसाच नाही. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने मदत दिली पाहिजे. त्यासाठी विरोधीपक्ष म्हणून आमचे प्रयत्न चालूच राहतील असे फडणवीस यांनी सांगितले.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devendra fadnavis criticizes thackeray government