MP Girish Bapat Death: बापटांना दिल्लीला जायचं होतं पण फडणवीस म्हणायचे कसब्यातच थांबा..

विधानसभा बापट फडणविसांची इच्छा म्हणून कसबा सोडून लोकसभेवर गेले
MP Girish Bapat Death
MP Girish Bapat Deathesakal

पुण्यातील भाजप खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी निधनाला माहिती दिली. गिरीष बापट गंभीर आजाराने त्रस्त होते. गेल्या दीड वर्षांपासून ते आजारी होते. त्यांचे आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस होत असे.

MP Girish Bapat Death
MP Girish Bapat Death: गिरीश बापट यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याला अश्रू अनावर

गिरीश बापट यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र बापटांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अश्रू अनावर झाले. फडणवीस गिरीश बापट अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आले होते.

यावेळी प्रतिक्रिया देताना त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी ते म्हणाले, "बापट यांच्यासोबत आमचे जवळचे संबंध होते, आमदार निवासात आम्ही १५ वर्ष एकत्र राहिलो आहे. गिरीश साहेब आमच्यासाठी जेवण बनवून आम्हाला खायला घालायचे, या माणसामध्ये माणसं जपायची कला होती, चपरासी पासून ते मंत्र्यांपर्यंत त्यांचे सलोख्याचे संबंध होते.

MP Girish Bapat Death
MP Girish Bapat Passes Away: पुण्यात उमेदवार कोणीही असो, निवडणूक बापट यांच्या सभोवतीच फिरायची!

ते बोलण्यामध्ये खुप तरबेज होते. विरोधकांना उत्तर देताना समोरचे शांत बसायचे कोणालाही न दुखवता विरोधकांना आपला मुद्दा पटवून देण्याची त्यांच्यात कला होती, पुण्याच्या जडण घडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे.

बापटांचे सर्व पक्षातील नेत्यांसोबत चांगले संबंध होते. कृष्णा खोरे महामंडळाचे प्रमुख म्हणून त्यांनी सिंचनाच जे काम केलं आहे ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोन्याच्या अक्षरात लिहिण्या सारखं आहे. अशा प्रकारचं व्यक्तिमत्त्व जाणं ही भाजपची मोठी हानी आहे.

२०१४ ला गिरीष बापट यांना दिल्लीला जाण्याची प्रचंड इच्छा होती. मी त्यांनी सांगत होतो भाऊ आपलं सरकार येणार आहे तुम्ही का जाता. त्यावेळी ते लोकसभा लढले नाहीत मात्र मंत्री असताना मला म्हणाले बरं झालं इथे ही चांगले काम करता येत लोकसभेत गेलो असते तर हा अनुभव मिळालाच नसता.

पण त्यांनी मानसिकता केली होती. २०१९ ची लोकसभेची निवडणुक लढवायची त्यांनी तयारी केली होती, ते लढले आणि जिंकूण आले त्यांना दिल्ली मानवली की नाही यावर काही सांगू शकत नाही. अशी प्रतिक्रया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com