'साहेब घरात फक्त चिखलच राहिला...' असे म्हणताच त्यांच्या डोळ्यात तरळले अश्रू

राजकुमार थोरात
Monday, 19 October 2020

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे आज पुणे जिल्ह्यातील पुरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. त्यांनी येथील नागरिकांशी संवाद साधला

वालचंदनगर : साहेब घरातील सगळं पुराच्या पाण्याने वाहून गेलं आहे... घरात फक्त चिखलच-चिखल राहिला असल्याची व्यथा सांगताच सणसर व अंथुर्णे मधील महिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे आज पुणे जिल्ह्यातील पुरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. त्यांनी येथील नागरिकांशी संवाद साधला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, इंदापूर तालुक्यामध्ये बुधवार (ता. १४) रोजी ढगफुटीसदृश्‍य पाऊस झाला. पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसल्याने अनेकांचे संसारच वाहून गेले आहे. आज सोमवार (ता. १९) फडणवीस यांनी इंदापूर तालुक्यामध्ये नुकसान झालेल्या गावांची पाहणी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यावेळी त्यांच्या समवेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, दौंडचे आमदार राहुल कुल, माजी मंत्री बाळा भेगडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे आप्पासाहेब जगदाळे, राजवर्धन पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष अॅड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, लालासाहेब सपकळ, उद्घटचे सरपंच रविंद्र यादव, नितीन माने, संग्राम निंबाळकर, अभयसिंह निंबाळकर, प्रताप रायते, गजानन वाकसे उपस्थित होते.

पुणे-दौंड लोकल उद्यापासून सुरू होण्याची शक्यता

सणसरमध्ये नागरिकांनी सांगितले की, पावसाच्या पाण्याने सगळंच वाहून गेले आहे. घराच्या खिडकीपर्यंत पावसाचे पाणी पोहचले होते. घराचे झालेले नुकसान सांगताना अनेकांना अश्रू अनावर झाले. अंथुर्णेमध्ये महिलांनी आमचे घरातील धान्य, कपडे वाहून गेले असून, संसारच वाहून गेला असून, शासकीय मदत करण्याची मागणी केले. यावेळी भाजपचे युवराज म्हस्के, डाॅ. नंदकुमार सोनवणे, नागासाहेब गवळी, शितल साबळे, सतिश भोसले यांनी फडणवीस यांना निवेदन देवून तात्काळ मदतीसाठी प्रयत्न करण्याची मागणी केली.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis surveyed the flood affected area in Indapur