
-डी. के. वळसे पाटील
मंचर : श्री क्षेत्र भीमाशंकरकडे येणाऱ्या भाविकांना तेरुंगण ते वनखात्याचा टोल नाका (ता. आंबेगाव) या तीन किलोमीटरच्या रस्त्यावर खड्ड्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शनिवारी (ता.१२) तब्बल ४० हजारांहून अधिक भाविकांची गर्दी असताना या लहानशा अंतरासाठी एक तास वेळ लागत होता. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, वनखात्याच्या टोल नाक्याजवळ अपुरा रस्ता यामुळे वाहनांची गती मंदावली. परिणामी, महिला, लहान मुले, ज्येष्ठ भाविकांचे हाल झाले.