
पुणे : संबळच्या तालावर जल्लोष करणारी तरुणाई...जिवंत देखावे पाहण्यात तल्लीन झालेले भाविक...पौराणिक देखाव्यांची लहान मुलांमध्ये असलेली उत्सुकता... अन् ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात मध्यवर्ती भागातील गर्दीने फुललेले रस्ते...असे भक्तिमय वातावरण पुण्याच्या मध्यवर्ती भागात पाहायला मिळत आहे.