शहरात भक्तिमय वातावरणात भाविक पांडुरंगचरणी नतमस्तक 

शहरात भक्तिमय वातावरणात भाविक पांडुरंगचरणी नतमस्तक 

पुणे - निराकार तो निर्गुण ईश्‍वर, जसा प्रगटला तसा विटेवर... उभय ठेविंले हात कटीवर, पुतळा चैतन्याचा... कानडा राजा पंढरीचा!! आषाढी एकादशीनिमित्त शहरातील विविध विठ्ठल मंदिरांतून असे सूर ऐकू येत होते. विठुनामाचा गजर करीत लाखो वैष्णव पांडुरंगचरणी नतमस्तक होतात. शहरामध्येही अनेक भक्तांनी पांडुरंगाच्या दर्शनासाठी रांग लावली होती. 

आषाढी एकादशीला देवशयनी एकादशीसुद्धा म्हणतात. याच दिवशी पंढरपूरची यात्रा असते. डोळ्यांचे पारणे फिटावे असा सोहळा तेथे या दिवशी असतो. महाराष्ट्रासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. 

शहरात उत्साही वातावरणात हा सोहळा पाहायला मिळाला. मध्यवर्ती पुण्यातील निवडुंग्या विठोबा, पालखी विठोबा, लकडी पूल, विठ्ठलवाडी यासोबतच उपनगरांमधील मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मंदिरांमध्ये गाभाऱ्यात फुलांच्या आकर्षक रचना केल्या होत्या. मंदिरांना केलेली रोषणाई, फुलांच्या रचना, रंगरंगोटी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. दिवसभर महाप्रसाद, कीर्तन, हरिपाठ यांसह धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काही स्वयंसेवी संस्थांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com