शिरूरच्या दुष्काळाबाबत धाक संघटनेतर्फे निवेदन

suryakant palande
suryakant palande

तळेगाव ढमढेरे (पुणे): शिरूर तालुक्‍यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यावर तातडीने उपाययोजनांसाठी कार्यवाही करावी, अशी मागणी शिरूर तालुका धाक संघटनेतर्फे अध्यक्ष व माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी निवेदनाद्वारे केली.

शिरूर तालुक्‍यातील केंदूर, पाबळ, धामारी, खैरेनगर, कान्हूर मेसाई, मिडगुलवाडी, चिंचोली मोराची, शास्ताबाद, बाभूळसर खुर्द आदी गावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. येथे त्वरित पाण्याचे टॅंकर सुरू करावेत, आवश्‍यक तेथे दावणीवर चारा व भाकड जनावरांसाठी छावणीची सुविधा त्वरित करावी, दुष्काळी भागात रोजगार हमी योजनेची कामे त्वरित सुरू करून रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, शेतकऱ्यांच्या फळबागा वाचविण्यासाठी फळबाग योजनेतून पाणीपुरवठ्याची सुविधा करावी, दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफ करावे; तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी; तसेच बाभूळसर खुर्द येथील शेतकऱ्यांनी पीकविम्याचे पैसे भरूनही येथील शेतकरी गेली चार वर्षे लाभापासून वंचित आहेत. त्यांना न्याय मिळवून द्यावा, आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत.

दरम्यान, आवश्‍यक ती कार्यवाही तातडीने केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com