प्रेरणा घेऊ महर्षी कर्वे संग्रहालयातून (व्हिडिओ)

महर्षी कर्वे यांचा पुतळा.
महर्षी कर्वे यांचा पुतळा.

पुणे - एकशेपाच वर्षे जगलेल्या, दिवसरात्र सामाजिक सुधारणेच्या ध्यासाने झपाटलेल्या एका थोर महर्षींचे कार्य जाणून घेण्यासाठी ‘महर्षी धोंडो केशव कर्वे संग्रहालय व स्मारक’ अवश्‍य पाहायला हवे.

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांची छायाचित्रे, पुस्तके, पत्रव्यवहार, हस्तलिखिते, त्यांना मिळालेले मानसन्मान यांच्या माध्यमातून आपण आत्ता जणू त्यांच्या सहवासातच आहोत, असे त्यांच्या या संग्रहालयात वाटत राहते. कर्वेनगरमधल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील हे संग्रहालय अनेकांसाठी प्रेरणेचा स्रोत ठरते. स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून ज्या महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अतोनात कष्ट घेतले, त्यांचा जीवनपट येथे विविध वस्तू व दस्तऐवजातून दिसतो. 

संस्थेच्या मनीषा शेणोलीकर यांनी येथील तीन दालनांमधली सफर घडवताना सांगितले, की सर अल्बर्ट आइनस्टाईनसारख्या थोर वैज्ञानिकाची व महर्षी कर्वे म्हणजेच अण्णा यांच्या भेटीच्या छायाचित्रासमोर विद्यार्थी खिळून राहतात. अण्णा एकशेपाच वर्षे जगले आणि शेवटच्या दिवसापर्यंत काम करत राहिले, हे खूप महत्त्वाचे आहे.

या संग्रहालयात अण्णांचे जन्मगाव, बालपण, घेतलेले शिक्षण, ऐतिहासिक समाजकार्य, हस्तलिखिते आहेत. संबंधित माहिती असलेल्या पॅनलच्या वरच्या बाजूला त्या-त्या कालावधीत जागतिक पातळीवर घडलेल्या घटनांच्या नोंदी आहेत. त्यामुळे अण्णांच्या आयुष्यात एखादी घटना घडताना जगात कोणती महत्त्वाची घटना घडत होती, याबद्दल कल्पना येते. अण्णांचा कोट, चपला, टोपी, काठी पाहताना वाटते की ते समोरच तर उभे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com