विंग कोळेत घाडगेनाथ वार्षिक यात्रेनिमित्त कुस्ती मैदानात पैलवान धनाजी कोळी प्रथम क्रमांकाचा विजेता
पुण्याचा धनाजी कोळी ‘घाडगेनाथ केसरी’
कोळ्यात यात्रेनिमित्त मैदान; सांगलीच्या प्रशांत शिंदेवर मात
विंग/काेळे, ता. १ : श्री संत घाडगेनाथ महाराज वार्षिक यात्रेनिमित्त कोळे (ता. कऱ्हाड) येथे झालेल्या कुस्ती मैदानात पुण्याच्या हनुमान आखाड्याचा पैलवान धनाजी कोळीने सांगलीच्या भोसले व्यायाम शाळेचा पैलवान प्रशांत शिंदेवर अखेरच्या क्षणी गुणावर मात केली. डाव- प्रतिडावाने दोन्ही मल्लांची दमछाक झाली. २५ मिनिटं कुस्ती रंगली. अखेरच्या क्षणी गुणावर धनाजी कोळी भारी ठरला. प्रथम क्रमांकाचे ७५ हजार रुपयांचे रोख बक्षीस आणि घाडगेनाथ केसरी किताब व मानाची गदा पटकावली. मैदानात लहान-मोठ्या ५० हून अधिक चटकदार कुस्त्या झाल्या. विभागातील स्थानिक मल्लांनी नेत्रदीपक यश मिळवले.
श्री संत घाडगेनाथ महाराज वार्षिक यात्रेत मोरया कला क्रीडा मंडळ, शंभू फॅन क्लब व ग्रामस्थांच्या विशेष सहकार्यातून कुस्त्यांचे सलग तिसऱ्या वर्षी मैदान यशस्वीपणे पार पडले. कुस्ती शौकिनांनी हजेरी लावली. द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीत सांगलीच्या हांडे-पाटील तालमीच्या पृथ्वीराज पवारने कोल्हापूर शाहूपुरी तालमीच्या विकी थोरातला पोकळ घिस्सा डावावर अवघ्या सातव्या मिनिटात अस्मान दाखवले. तृतीय क्रमांकासाठी कऱ्हाड छत्रपती आखाड्याचा पैलवान साहिल पोळने पुण्याच्या हनुमान आखाड्याचा पैलवान माऊली मारकडवर गुणावर विजय नोंदवला. कडेगावचा पैलवान शुभम पवारने रेठरे खुर्दच्या पैलवान शिवराज मोहितेवर गुणाने मात केली. यासह कुसूरच्या इंद्रजित शिंदेने इचलकरंजीच्या सौरभ पाटीलला एकछाक डावावर चितपट केले. विंगचा पैलवान ऋषी खबालेने सांगलीच्या विजय होळकरवर गुणांनी मात करत सहाव्या क्रमांकाची कुस्ती जिंकली. पैलवान आशिष कुंभार, पैलवान शिवम गरुड, जय भोसले, शंभूराज पाटील, गौरव यादव, आदित्य भोसले, ओम माने, लक्ष्मण मोरे, साईश चवरे, ऋतुराज यादव, प्रज्वल मोहिते, वेदांत कुंभार आदी मल्लांनी चटकदार कुस्त्या करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. जयकर खुडे, आण्णासाहेब चव्हाण, अभिजित पाटील, उमेश महाजन, सचिन भोसले, भगवान यादव, दादासाहेब चव्हाण, धनाजी पोळ यांनी पंच म्हणून काम पाहिले.
ज्याेतिर्लिंग पतसंस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण देसाई, घाडगेनाथचे संस्थापक राजेंद्र चव्हाण, उपसरपंच सुधीर कांबळे, माजी सरपंच श्रीकांत कुंभार, माजी उपसरपंच समाधान शिनगारे, पांडुरंग सावंत, अविनाश पाटील, जावेद फकीर, श्रीकृष्ण पाटील, संतोष पाटील, मुन्ना भोजगर, सुनील शिनगारे, साहेबराव देसाई, रमीज इनामदार, राहुल फिरंगे, बाबूराव जाधव, रोहन पाटील, संदीप फिरंगे, नीलेश फिरंगे, अनिल लटके, महेश कराळे चेतन पवार यासह मोरया मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. सुरेश जाधव यांनी निवेदक म्हणून काम पाहिले.
..........
चाैकट
............
नामांकित मल्लांचा सहभाग
श्री संत घाडगेनाथ विद्यालयाच्या मैदानात झालेल्या मैदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतून नामांकित मल्ल सहभागी झाले होते.
....................................
B02167
कोळे ः प्रथम क्रमांकाचा विजेता पैलवान धनाजी कोळी यास मानाची गदा व ७५ हजार रोख बक्षीस देऊन गौरविताना मान्यवर. (विलास खबाले ः सकाळ छायाचित्रसेवा)
..........................................
------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

