
“Site of the demolished house of Hindu Sena leader Dhananjay Desai, with police presence and local residents.”
esakal
Summary
हिंदुराष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांचे पौड येथील घर न्यायालयीन आदेशांशिवाय पाडण्यात आले.
पाडकामाच्या वेळी ९० वर्षीय वृद्ध आणि महिला घरात असतानाही जबरदस्तीने बाहेर ओढण्यात आल्या.
महिलांचा विनयभंग करण्यात आल्याचा व अत्याचाराची धमकी दिल्याचा गंभीर आरोप झाला आहे.
हिंदुराष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय जयराम देसाई घर न्यायालयाची परवानगी नसतानाही पाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही तर घर पाडायला विरोध करणाऱ्या महिलांचा विनभंग करुन विलास परमार नावाच्या व्यक्तीने महेश खाडे व ३५ ते ४० गुंडांना सोबत घेऊन अत्याचाराची धमकी दिली. पोलिसांनी या प्रकरणात बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे.