

Uruli Kanchan Athlete Dhananjay Madane Bags Three Gold Medals at Maharashtra State Masters Games 2026 in Nashik
esakal
-सुनील जगताप
उरुळी कांचन: जिद्द,चिकाटी,कठोर परिश्रम आणि खेळाप्रती असलेली निष्ठा यांच्या जोरावर आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा पुणे येथील इनोसंट टाइम्स स्कूलचे क्रीडाशिक्षक धनंजय लक्ष्मण मदने यांनी नाशिक येथे झालेल्या ७ व्या महाराष्ट्र राज्य मास्टर्स गेम्स २०२६ मैदानी क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल तीन सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले.त्यांच्या या देदीप्यमान यशामुळे क्रीडा क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.