"मी मुख्यमंत्री' सांगण्यासाठीच  महाजनादेश यात्रा : धनंजय मुंडे 

munde
munde

राजगुरुनगर (पुणे) :  राज्यात सध्या "मी मुख्यमंत्री' एवढे सांगण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी भाजपची महाजनादेश यात्रा काढली. आदित्य ठाकरेंनी शिवसेनेची जनआशीर्वाद काढली. जनतेच्या दुःखाशी त्यांना काहीही देणेघेणे नाही, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येथे केली. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसने जनतेचे राज्य आणायचे म्हणून शिवस्वराज्य यात्रा काढली असल्याचे मुंडे यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची खेड तालुक्‍यासाठीची सभा चांडोलीच्या रिद्धी-सिद्धी मंगल कार्यालयात झाली, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, फौजिया खान, रूपाली चाकणकर, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, पोपटराव गावडे, रामभाऊ कांडगे, विलास लांडे, प्रदीप गारटकर, कैलास सांडभोर, संध्या जाधव, सुभाष होले आदी उपस्थित होते. 

मुंडे म्हणाले, ""जनतेसाठी काय केले? हे या दोन यात्रांमधून सांगत नाहीत, तर मी मुख्यमंत्री एवढेच सांगण्यासाठी या यात्रा काढल्यात, असे दिसते. त्यात आता चंद्रकांतदादा पाटीलही पक्षाने सांगितले तर मुख्यमंत्री होतील, असे म्हणताहेत. एकविसाव्या शतकात छत्रपतींच्या घरात पुन्हा "अनाजीपंतांनी' फूट पाडली आहे. सरदार पटेलांचे स्मारक होते आणि छत्रपतींचे रखडते, हा छत्रपतींचा अपमान आहे.'' 
सुनील थिगळे यांनी सूत्रसंचालन केले. कैलास लिंभोरे यांनी आभार मानले. 

महाराष्ट्राला पुराने वेढलेय आणि मंत्री नाशिकमध्ये नाचताहेत. यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकरी आत्महत्या करताहेत, कारखाने बंद पडताहेत, शेअर बाजार कोसळतोय आणि अगदी कॅफे कॉफी डेच्या मालकानेही आत्महत्या केली. भावनिक मुद्द्यांनी समाजासमोरचे प्रश्न सुटणार नाहीत की संसार चालणार नाहीत. 
- अजित पवार, माजी मुख्यमंत्री 

निवडणुकीत शिवछत्रपतींचे नाव घेणाऱ्यांना त्यांचा विसर पडला असून, त्यांच्या एकाही खासदाराने संसदेत शिवछत्रपतींचे नाव घेतले नाही. पीकविम्याचे दावे 15 दिवसांत मिळवून द्यायचा शिवसेनेला विसर पडलाय. राज्याला स्वतंत्र गृहमंत्री नसून मुख्यमंत्र्यांचे शहरच गुन्ह्यांची राजधानी झाल्याने "कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' असे त्यांनाच विचारायची वेळ आली आहे. 
- अमोल कोल्हे, खासदार 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com