धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

लोणंद : धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी खंडाळा तालुक्यातील धनगर समाज आक्रमक झाला आहे. शुकवारी (ता.3 ऑगस्ट) बेमुदत साखळी उपोषण व भव्य मोर्चा काढून आंदोलन छेडण्याचा इशारा धनगर समाजाच्या वतीने आज (ता.31) खंडाळ्याचे तहसीलदार विवेक जाधव यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

राज्यात मराठा आरक्षणचा आंदोलनाचा भडका उडाला असतानाच आता हक्काचे एसटी प्रवर्गातील आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाज बांधवांनी अंदोलणाचे हत्यार उपसले आहे. शुक्रवारी (ता.3) रोजी सकाळी 11 वाजता संपुर्ण तालुक्यातील धनगर समाज बांधव लोणंद येथे अहिल्यादेवी होळकर स्मारकातील अहल्यादेवींचा पुतळ्यास पुष्पहार अर्पन करून येथे जाहीर निषेध मोर्चास प्रारंभ करणार आहेत. संपुर्ण तालुक्यातुन हा मोर्चा खंडाळा तहसीलदार कचेरी येथे नेहून तेथे निषेध नोंदवून बेमुदत साखळी उपोषण करणार आहेत. तसे निवेदन आज खंडाळ्याचे तहसिलदार जाधव यांना दिले आहे.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके पाटील, खंडाळा पंचायत समितीचे माजी सभापती रमेश धायगुडे-पाटील, लोणंदचे नगरसेवक हणमंतराव शेळके पाटील, बबनराव शेळके, अशोक धायगुडे, बाळासाहेब शेळके, सत्त्वशील शेळके, भाजपा औद्योगिक सेलचे खंडाळा तालुका अध्यक्ष नवनाथ शेळके पाटील, शिवसेनेचे विभाग प्रमुख संदीप शेळके पाटील, मोहन शेळके पाटील, लोणंद कराडवाडीचे सरपंच कुंडलिक ठोंबरे, मोर्वेचे माजी उपसरपंच ज्ञानेश्वर धायगुडे, यांच्यासह तालुक्यातील विविध पक्षातील पदाधिकारी व धनगर समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Web Title: Dhangar community aggressive for the reservation