...अन् त्यांनी केली मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती

मिलिंद संगई
रविवार, 15 सप्टेंबर 2019

धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर नेमका काय निर्णय घेणार अशी विचारणा आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बारामतीत करण्यात आली.

बारामती शहर  : धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर नेमका काय निर्णय घेणार अशी विचारणा आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बारामतीत करण्यात आली.

आज या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह धनगर समाजाच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत ताब्यात घेतले.

मुख्यमंत्र्यांची भेट हवी असल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले नंतर पोलिसांनी विमानतळावर मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणण्याचे आश्वासन या कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानुसार हे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना विमानतळावर भेटले व त्यांनी धनगर आरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना धनगर आरक्षणाची बाब आता न्यायालयात असून सरकारने जे काही निर्णय घ्यायचे होते ते घेतले आहेत असे सांगितले. 

मात्र मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने संबंधित कार्यकर्त्यांचे समाधान झाले नाही, त्यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती करण्याचा प्रयत्न केला मात्र मुख्यमंत्र्यांना घाई असल्यामुळे मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने वरवंडच्या दिशेने निघून गेले. या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरावर नापसंती व्यक्त केली. याप्रसंगी बापूराव सोलनकर, अविनाश भिसे, माणिक काळे, विजय गावडे, दिलीप नाले, कुंदन देवकाते, आबा बोरकर, आबा टकले, महेश गावडे, निखिल देवकाते अधिक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhangar community criticizes CM