esakal | धायर : चव्हाण शाळेत बँड लावून वाजत-गाजत विद्यार्थ्यांचे स्वागत । School
sakal

बोलून बातमी शोधा

धायर : चव्हाण शाळेत बँड लावून वाजत-गाजत 
विद्यार्थ्यांचे स्वागत

धायर : चव्हाण शाळेत बँड लावून वाजत-गाजत विद्यार्थ्यांचे स्वागत

sakal_logo
By
विठ्ठल तांबे

धायर : अखेर कोरोनामुळे तब्बल दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा आज सोमवारपासून सुरू करण्यात आल्या. खडकवासला विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने कै. बंडोजी खंडोजी चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या प्रशालेत शाळा महोत्सव आयोजित केला होता. बँड पथकाने वाजतगाजत विद्यार्थ्यांनचे स्वागत करण्यात आले.

हेही वाचा: इंदापूर: गुलाब पुष्प व मास्क देऊन विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत

शाळा महोत्सव प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष व खडकवासला विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सोपान उर्फ काकासाहेब चव्हाण, संस्थेचे कार्याध्यक्ष नंदूशेठ बंडोजी चव्हाण, बाळासाहेब रायकर, महेंद्र भोसले, सुनील घुले, सचिन बेनकर,प्रतीक पोकळे, संदीप चव्हाण, तृप्ती पोकळे, सुनिता सोपान, चव्हाण विनायक बेनकर, कुंदन बेनकर, बाबासाहेब बेनकर, बबन बेनकर , विशाल बेनकर, अनिकेत चव्हाण व धनराज चव्हाण संस्थेच्या सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा: लातूर : विजेचा शॉक लागून खाजगी लाईन मॅनचा मृत्यू

सोपान उर्फ काकासाहेब बंडोजी चव्हाण यांनी सर्व विद्यार्थ्यांचे शाब्दिक स्वागत केले व पुढील काळात करोनाने नियमांचे पालन चांगल्या पद्धतीने करावे, अशाप्रकारे विद्यार्थ्यांना आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांना मास्क चे वाटप करण्यात आले. बँड पथकाने व राष्ट्रगीताने शालेय महोत्सवाची सुरुवात झाली. शाळा महोत्सव याप्रसंगी शिक्षण विभागाचे शिक्षण सहायक संचालक शिक्षण आयुक्तालय पुणे येथील माननीय महेश पालकर साहेब हे उपस्थित होते. त्यांनी शाळेची पाहणी करून विद्यार्थ्यांचे स्वागत व कौतुक केले. आज संस्थेच्या विविध विभागात ७५० पेक्षा जास्त विद्यार्थी शाळेत आज उपस्थित होते. शाळेचे सर्व वातावरण आनंदीमय झाले होते.

loading image
go to top